Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची (Rain) संततधार सुरू आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने (monsoon) अक्षरशः थैमान घातल आहे. यामुळे सर्वाधिक शेती (agriculture) क्षेत्र प्रभावित होत असून साधारण जनजीवन देखील विस्कळीत झाल आहे.

या खरीप हंगामातील (kharif season) पिके सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे (monsoon news) अडचणीत सापडले असून शेतकर्‍यांना यामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. राज्यात विदर्भ कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली असून धरणातील पाण्याचा विसर्ग नदीच्या पात्रामध्ये केला जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील यावेळी स्थानिक प्रशासनाकडून दिला जात आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (imd) वर्तवला सुधारित हवामान अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यात पावसाचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या चिंतेत अजून भर पडणार आहे. पुढील तीन दिवस राज्यातील कोकण किनारपट्टी विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने या विभागांना येलो अलर्ट जारी केला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे विदर्भातील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे विदर्भातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. विदर्भ प्रमाणेच कोकणातील तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या चिंतेत देखील या पावसामुळे भर पडली आहे. खरीप हंगामातील पिके ऐन वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने धुमाकूळ घातला असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून तरी बांधवांच्या उत्पन्नात कमालीची घट यामुळे होणार आहे.

शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पिकांसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च तसेच त्यांची मेहनत देखील या पाण्यामुळे वाया जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोगराई चे सावट देखील मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना पीक व्यवस्थापनासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. एकंदरीत पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांची संपूर्ण नासाडी झाली आहे तर ज्या ठिकाणी थोडीफार पिके शिल्लक राहिले आहेत त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना पीक व्यवस्थापनासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.