Maharashtra Weather: राज्यात गेल्या आठवड्यापासून विविध जिल्ह्यात पावसाची (Rain) संततधार सुरू आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या (Farmer) चिंतेत भर पडली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र देखील बघायला मिळाले आहे.

मुसळधार पावसामुळे राज्यात (Maharashtra Weather Update) अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने नदीकाठी वसलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा यावेळी दिला आहे.

धरणाच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठी वसलेल्या शेतकऱ्यांच्या वावरातील पिके भुईसपाट झाली असून शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड यामुळे बसला आहे. दरम्यान महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई दुपटीने देऊ करण्याचा दिलासादायक निर्णय देखील घेतला आहे.

मात्र असे असताना पुन्हा एकदा राज्यात पावसामुळे (Monsoon News) थैमान बघायला मिळणार आहे. राज्यात पावसासाठी (Monsoon) पोषक वातावरण तयार होत असल्याने पुढील चार दिवस पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे. यामुळे पावसामुळे (Heavy Rain) वाचलेले पिके पुन्हा एकदा पावसाच्या भक्षस्थानी सापडणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्या जिल्ह्यात राहणार पावसाचा जोर

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात पावसाचे धुमाकूळ बघायला मिळणार आहे. पुढील चार दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) यावेळी जारी केला आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांशी धरणे (Dam) ही शंभर टक्के भरले आहेत. उजनी, भंडारदारा ही दोन्ही धरणे पावसाने लबालब भरली असून येत्या काही दिवसात या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. यामुळे नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. दरम्यान राज्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरले असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात याचा फायदा होणार असून पाण्याचा ताण मिटणार आहे.