Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाचा (Rain) जोर कमालीचा कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्यात अजूनही परतीचा पाऊस (Monsoon) कोसळत असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस कोसळत आहे. राजधानी मुंबई तसेच ठाणे परिसरात परतीचा पाऊस (Monsoon News) बघायला मिळत आहे. यामुळे शहरी भागात तात्पुरते जनजीवन विस्कळीत झाले होते.

दरम्यान काल मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातही पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. आज देखील राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) नमूद केले आहे. आज भारतीय हवामान विभागाने कोंकण तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता (Rain Alert) असल्याचे सांगितले आहे.

या अनुषंगाने या दोन्ही विभागांसाठी भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी जाणकार लोक करत आहेत. मित्रांनो आज कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता या तीनही जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला.

याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मात्र आज सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता नसल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आज नासिक तसेच अहमदनगर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. एकंदरीत आज राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे चित्र आहे.

याशिवाय राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. निश्चितच तूर्तास तरी राज्यात परतीचा पाऊस बरसत राहाणार असल्याचे चित्र आहे. मित्रांनो या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय सध्या परतीचा पाऊस कोसळत असल्याने हा पाऊस आगामी रब्बी हंगामासाठी अतिशय पोषक असल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.

मित्रांनो खरे पाहता खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र राज्यात आता प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली असल्याने तसेच नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि विहिरींना मुबलक पाणी आले असल्याने शेतकरी बांधवांना येत्या हंगामासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे. एकंदरीत या वर्षी उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे पुढील दोन्ही हंगाम शेतकरी बांधवांसाठी चांगले लाभदायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.