Maharashtra Rain : राज्यात ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यात राज्यात पावसाने (Rain) कमालीची विश्रांती घेतली होती. मात्र 31 ऑगस्ट रोजी म्हणजे गणरायाच्या आगमनाच्या दिवशी राज्यात पुन्हा एकदा पावसाला (Monsoon) सुरुवात झाली आहे.

31 तारखेला राज्यातील अनेक भागात पाऊस (Monsoon News) कोसळला. काल म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यातील नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाची (Rain Alert) हजेरी बघायला मिळाली. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये (Farmer) समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

खरं पाहता ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने उघडीप दिली होती यामुळे खरिपातील पिके (Kharif Crops) होरपळत होती. मात्र राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असल्याने खरीप हंगामातील पिकांना आता नवसंजीवनी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

आता मान्सून हा शेवटच्या टप्प्यात असून आगामी काही दिवसात मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र जाताजाता मान्सून सरासरीपेक्षा अधिक बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार (Maharashtra Weather Report) सप्टेंबर महिन्यात मान्सून हा सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.

हवामान विभागाच्या महासंचालकांनी सदर माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास हा सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून होणार आहे. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात 109 टक्के पावसाचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यात देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे जाता जाता मान्सून चांगली कामगिरी करणार आहे.

आज कस असेल महाराष्ट्रात हवामान

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. राज्यातील कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर कोकणातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. कोकण व्यतिरिक्त राज्यातील मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

याशिवाय आज मराठवाडा आणि विदर्भांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विशेष दिलासा मिळणार आहे. मित्रांनो मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने तेथील पिके होरपळत आहेत. यामुळे भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज तेथील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे.