Maharashtra Rain: मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या चरणातील पाऊस (Monsoon News) राज्यात जोरदार स्वरूपात कोसळत आहे. आज राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी (Rain) पोषक वातावरण असून पावसाची शक्यता पाहता पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) आज पुन्हा राज्यातील (Maharashtra Weather Update) काही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आज शुक्रवारी राज्यातील विदर्भात तसेच मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभाग केंद्र मुंबईने (Mumbai Weather Department) संबंधीत जिल्हयांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, उद्या देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

उद्या विदर्भ तसेच मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे यामुळे अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी येथे 20 ऑगस्टला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  याशिवाय उद्या गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान विभाग केंद्र मुंबई यांच्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र पावसाचा त्राहिमाम् बघायला मिळाला. एवढेच नाही तर ऑगस्ट महिन्यातील पहिले दोन आठवडे राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली. परिणामी शेतकरी बांधवांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. सध्या पावसापासून जी पिके वाचली आहेत त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी बांधव प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.