Maharashtra Monsoon Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली होती. मात्र काल राज्यातील अनेक भागात वरुणराजाने हजेरी लावली आहे. राज्यात गणरायाच्या आगमनाबरोबरच वरूणराजाचे (Maharashtra Rain) देखील आगमन झाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे.

दरम्यान देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. काल महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, आजही अनेक राज्यांमध्ये पावसाची (Monsoon) प्रक्रिया सुरू राहण्याचा अंदाज आहे.

मित्रांनो या अनुषंगाने भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी करताना देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Monsoon News) शक्यता व्यक्त केली आहे. पुढील 24 तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, ईशान्य उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात पावसाची शक्यता (Rain Alert) असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले गेलं आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 3 सप्टेंबरपर्यंत पाऊस आणि विजांचा कडकडाट कायम राहणार असून या विभागाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय आपल्या मध्य महाराष्ट्रात आणि किनारी कर्नाटकात देखील पावसाची शक्यता आहे.

देशात कुठे कोसळणार मुसळधार पाऊस वाचा 

मित्रांनो भारतीय हवामान विभागाने वर्तवला आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, पुढील 24 तासांत भारतातील अनेक राज्यात पावसाची शक्यता आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, बिहारचा काही भाग, ईशान्य उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, किनारी कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटे आणि दक्षिण कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केरळमध्ये देखील जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. एकंदरीत भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या नवीन अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. मित्रांनो खरे पाहता ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात धुमाकूळ घालत असलेला मान्सून ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यात जणूकाही गायबच झाला होता. यामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी खरीप हंगामातील पिके करपत आहेत. मात्र काल गणरायाच्या आगमना बरोबरच राज्यात पावसाचे देखील आगमन झाले असल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे. दरम्यान आज देखील मध्य महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असल्याने शेतकरी बांधव सुखावला असल्याचे चित्र आहे.