Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) सुधारणा होत असल्याचे चित्र होते. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) दिलासा मिळत होता. मात्र आता कांदा बाजार भावात (Onion Market Price) पुन्हा एकदा घसरण होण्यास सुरूवात झाली आहे.

मित्रांनो, खरं पाहता केंद्र सरकारने नुकत्याच काही दिवसापूर्वी बफर स्टॉक मधील कांदा किरकोळ बाजारात कांदा (Onion Crop) दर नियंत्रित राहावे या हेतूने खुल्या बाजारात उतरविला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने तब्बल 54 हजार टन कांदा राज्यांना पाठवला आहे.

खरं पाहता कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याला 40 रुपये प्रति किलोपर्यंत चा बाजार भाव मिळत आहे. तसेच काही जाणकार लोकांनी कांद्याला पन्नास रुपये प्रति किलोपर्यंतचा बाजार भाव मिळू शकतो असे देखील भाकीत वर्तवले होते. या अनुषंगाने केंद्र सरकारने कांद्याच्या किमती नियंत्रित राहावे या हेतूने बफर स्टॉक मधून कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी काढला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे निश्चितच सामान्य जनतेला स्वस्तात कांदा मिळणार आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य जनतेला स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून यामुळे शेतकरी बांधवांची दिवाळी मात्र अडचणीची राहणार आहे. या निर्णयाचे पडसाद आता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) साफ पाहायला मिळत आहेत.

शनिवारी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. गेल्या हफ्त्याच्या तुलनेत या शनिवारी कांद्याची आवक तब्बल पाचशे क्विंटलने वाढली आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस काढला आहे. मात्र बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याचे बाजार भाव कमी झाले आहेत.

शनिवारी चाकण एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात कांदा बाजार भावात सरासरीच्या तुलनेत शंभर रुपयांची घट झाली. कांद्याला चाकण एपीएमसीमध्ये 2300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळत होता मात्र शनिवारी झालेल्या लिलावात चाकण एपीएमसीमध्ये कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटल एवढाच बाजार भाव मिळाला आहे.

म्हणजेच क्विंटल मागे शंभर रुपयांची घसरण नमूद करण्यात आली आहे. कांदा दरात झालेल्या वाढीमुळे शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळत असताना सरकारने घेतलेला हा निर्णय आणि त्यानंतर कांदा बाजार भावात झालेली घसरण दोघेही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहेत.

यामुळे केंद्र शासनाचा हा निर्णय अजून कांदा दरात घसरण घडवून आणेल की काय अशी भिती देखील यावेळी शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. यामुळे भविष्यात कांद्याला काय बाजार भाव मिळतो यावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार.