Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) थोडीशी सुधारणा झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) दिलासा मिळत आहे.

मात्र असे असले तरी किरकोळ बाजारात कांद्याचे बाजार भाव 40 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचले असल्याने आणि येत्या काही दिवसात पन्नास रुपये प्रतिकिलो पर्यंत कांदा बाजारभाव (Onion Market Price) किरकोळ बाजारात वाढण्याची शक्यता असल्याने आता केंद्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे शेतकर्‍यांना मोठा धक्का बसणार आहे.

मित्रांनो कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी केंद्र शासनाने (Government) 54 हजार टन कांदा बफर स्टॉक मधून खुल्या बाजारात विक्री केल्याचे समोर आले आहे. कांद्याच्या किमती (Onion Price) नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडे 2.5 लाख टन कांदा बफर स्टॉक मध्ये शिल्लक आहे. आता सरकारने गेल्या आठवड्यातच राज्यांना कांद्याचा पुरवठा सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि गुवाहाटी या ठिकाणी कांद्याच्या किमती सरासरीपेक्षा अधिक आहेत. परिस्थितीत केंद्र शासनाने या दोन शहरात पन्नास हजार टन कांदा बफर स्टॉक मधून खुल्या बाजारात विक्रीसाठी आणला आहे. मित्रांनो खरे पाहता महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन मुख्य कांदा उत्पादक राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान माजवले आहे.

अशा परिस्थितीत या दोन प्रमुख कांदा उत्पादक राज्यात कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचे उत्पादन कमी झाल्यास साहजिकच बाजारपेठेत कांद्याची आवक कमी होऊन कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांकडून वर्तवण्यात आली आहे.

खरे पाहता नवीन कांदा बाजारात येण्यास अजून एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे कांदाचाळीत साठवलेला कांदा देखील आता बाजारात दाखल होत असून येत्या काही दिवसात किरकोळ बाजारात कांद्याचे दर पन्नास रुपये होण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा दिवसात कांद्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली असल्याने कांदा दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे घाऊक बाजारात देखील कांदा बाजार भावात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे सहाजिकच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चिंतेत वाढ होणार आहे.