Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

खरे पाहाता, कांदा चाळीत साठवलेला कांदा आता संपत आल्याने तसेच कांदाचाळी साठवलेल्या कांदा (Onion Crop) हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात सडला असल्याने आणि नवीन कांदा बाजारात अजून मोठ्या प्रमाणात दाखल झाला नसल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.

बाजारात आवक कमी होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) वाढ होत आहे. यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची (Onion Grower Farmer) दिवाळी गोड होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी दावा केला आहे की, आगामी काही दिवस कांदा दरात झालेली वाढ कायम राहणार आहे.

यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मते, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून खूपच कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. शेतकरी बांधवांचा कांदा कमी दरात विक्री झाला आहे तर काही शेतकऱ्यांचा कांदा बराकीत सडला आहे. यामुळे कांदा दरात झालेली वाढ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक फायदा देणारी आहे. मात्र असे असले तरी ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्यांना या दराचा फायदा होणार आहे.

दरम्यान काल झालेल्या लिलावात अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ नमूद करण्यात आले आहे. काल या बाजार समितीमध्ये 270 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच कालच्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान काल पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांदा आवक नमूद करण्यात आली. या एपीएमसीमध्ये काल 22 हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली.

तसेच या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात काल कांद्याला तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किंमत बाजार भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2250 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. 

निश्चितच पिंपळगाव बसवंत एपीएमसीमध्ये कांद्याची आवक वाढून देखील कांदा दर स्थिर राहिले. यामुळे शेतकरी बांधवांना आगामी काळात कांदा दरात अशीच वाढ कायम राहणार असल्याची आशा आहे. जाणकार लोक देखील याच गोष्टीला दुजोरा देत आहेत.

त्यामुळे भविष्यात कांदा दरात अशीच वाढ कायम राहते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान आज 19 ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या लिलावात महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याला 1400 रुपये प्रतिक्विंटल ते 2025 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. 

 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
19/10/2022
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 20 1000 1800 1400
वाई लोकल क्विंटल 25 1000 2000 1500
लासलगाव उन्हाळी क्विंटल 17324 700 2631 2025
18/10/2022
कोल्हापूर क्विंटल 3120 700 2200 1400
औरंगाबाद क्विंटल 714 300 2100 1250
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 8651 1500 2400 1950
जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 36 300 2510 2000
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 15051 1500 2750 2200
सोलापूर लाल क्विंटल 19887 100 3000 1400
धुळे लाल क्विंटल 1846 150 2000 1500
पंढरपूर लाल क्विंटल 951 200 2500 1200
साक्री लाल क्विंटल 17500 400 2180 1600
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 270 1500 3500 2500
पुणे लोकल क्विंटल 9790 800 2200 1500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 29 1000 1600 1300
पुणे-मोशी लोकल क्विंटल 367 500 1800 1150
मलकापूर लोकल क्विंटल 410 500 1775 1035
कामठी लोकल क्विंटल 40 1000 1600 1500
संगमनेर नं. १ क्विंटल 2189 2100 2612 2356
कल्याण नं. १ क्विंटल 3 1600 2400 2000
संगमनेर नं. २ क्विंटल 1313 1500 2000 1750
संगमनेर नं. ३ क्विंटल 875 500 1000 750
चंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 210 1800 2500 2000
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 2000 150 2201 1550
नाशिक उन्हाळी क्विंटल 3024 350 2150 1600
लासलगाव उन्हाळी क्विंटल 7650 800 2550 1900
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 13080 700 2451 1950
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 11000 200 2301 1750
चाळीसगाव उन्हाळी क्विंटल 1500 200 1890 1500
चांदवड उन्हाळी क्विंटल 4700 706 2490 1650
मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 1000 2099 1850
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 9080 500 2345 1700
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 3540 525 2360 1840
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 22000 550 3100 2250
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 4720 500 2020 1630
देवळा उन्हाळी क्विंटल 8430 1000 2155 1900
नामपूर उन्हाळी क्विंटल 14960 100 2695 2300