kanda bajarbhav

Kanda Bajarbhav : कांदा (Onion Rate) हे पीक संपूर्ण भारत वर्षात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. या पिकाची संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात लागवड (Onion Farming) केली जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये कांदा लागवडी खालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मात्र गत दोन महिन्यापासून कांद्याच्या दरात (Onion Market Price) सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.

सध्या कांद्याला कांदा उत्पादक राज्यात कांद्याला खूपच कमी दर मिळत आहे. मध्य प्रदेश राज्याचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर पेक्षा किमती तब्बल 61 टक्के कमी झाल्या आहेत. मध्यप्रदेश मध्ये सध्या कांद्याला 850 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्रात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत 47% किमती कमी झाल्या आहेत.

गेल्या सप्टेंबर महिन्यात कांद्याला 1106 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळत होता. मात्र या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांदा दरात सुधारणा झाली आहे. मात्र असे असले तरी जाणकार लोकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. जाणकार लोकांच्या मते पुढील तीन-चार महिने कांद्याच्या दरात सुधारणा होणार नसल्याचे चित्र आहे.

कांद्याचे भाव न वाढण्याचे कारणे नेमके कोणती

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी कांदा पीक हे निरोगी आहे. देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यात यावर्षी कांदा पिकावर कोणताच मोठा रोग आढळून आलेला नाही. त्यामुळे सहाजिकच कांद्याच्या उत्पादनात या वर्षी वाढ होणार आहे. शिवाय आता कांदा साठवणुकीसाठी प्रगत तंत्रांचा अवलंब शेतकरी बांधव (Farmer) करत आहेत.

शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेत शेतकरी बांधवांनी कांदा साठवणुकीसाठी (Onion Storage) आधुनिक कांदाचाळीची निर्मिती केली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी भल्या मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. शिवाय चालू हंगामात कांद्याचे उत्पादन वाढणार आहे.

एकंदरीत कांदा चाळीतील साठवलेला कांदा आणि चालू हंगामात कांदा पिकावर कोणताही रोग किंवा अन्य हवामान बदलाचा परिणाम झालेला नाही म्हणजेच म्हणजेच आवक येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. निश्चितच कांदा आवक वाढली म्हणजे कांद्याचे बाजारभाव पडलेलेच राहणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील कांद्याच्या किमती या फारच कमी आहेत.

अशा परिस्थितीत कांद्याला उठाव नाही. यामुळे देशांतर्गत कांदा बाजारात खूपच कमी किमतीत विकला जात आहे. अशा परिस्थितीत जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात कांदा ऐवजी तरकारी किंवा भाजीपाला पिकांच्या शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. शिमला मिरची टोमॅटो मटार यांसारख्या बागायती पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचा जाणकार लोकांनी दावा केला आहे.