Jackfruit Farming: भारतात आता मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली जात आहे. फणस (Jackfruit Crop) देखील एक प्रमुख फळबाग पिकं आहे. याच्या शेतीतुन (Farming) देखील शेतकऱ्यांना चांगला नफा (Farmer Income) मिळू शकतो.

जाणकार लोकांच्या मते, याचे पिक आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढवण्यातही ते खूप उपयुक्त ठरू शकते. या पिकाची योग्य पद्धतीने लागवड केल्यास त्यातून 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मोठ्या शहरांमध्ये फणसला खूप मागणी आहे. याचा उपयोग भाजी बनवण्यासाठी आणि लोणची बनवण्यासाठी केला जातो.

यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळत असल्याने हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. फणस अनेक आजारांत उपयोगी असल्याचे सांगितले जाते. कर्करोगासारख्या आजारांवरही ते गुणकारी असल्याचे सांगितले जाते. बरेच लोक जे मांसाचे सेवन करत नाहीत, ते त्याचे सेवन करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतात. यामध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात. बाजारातील मागणीमुळे त्याचे दरही चांगले आहेत.

विशेष म्हणजे फणसाचे झाड एकदा लावले की अनेक वर्षे उत्पन्न मिळते. त्याच्या झाडाला विशेष काळजीची आवश्यकता नसते. त्यामुळे थोडी काळजी घेतली तरी शेतकरी बांधव यातून बंपर उत्पादन सहज घेऊ शकतात. जाणकार लोकांच्या मते जर शेतकरी बांधवांनी जर फणसाच्या सुधारित जातींची (Jackfruit Variety) लागवड केली तर निश्चितच त्यांना यातून दुप्पट नफा मिळणार आहे, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

स्वर्ण पूर्ती:- फणस भाजी म्हणून पिकवायचे असल्यास ही एक चांगली जात मानली जाते. या जातीची फळे लहान (3-4 किलो), गडद हिरवी रंगाची, कमी फायबर, बिया लहान व पातळ आवरण आणि मधला भाग मऊ असतो. या जातीची फळे उशिरा पिकत असल्याने दीर्घकाळ भाजी म्हणून वापरता येतात. त्याची झाडे लहान आणि मध्यम पसरणारी आहेत ज्यात वर्षाला 80-90 फळे येतात.

गोल्डन मनोहर:- फणसाची या जातिचे झाडे लहान असतात. मात्र फळ मोठी असतात आणि फळांची संख्या अधिक असते. या जातीला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फळे येतात. यातून निश्चितचं चांगले उत्पन्न मिळू शकते.  फळधारणा झाल्यानंतर 20-25 दिवसांनी एका झाडापासून 45-50 कि.ग्रॅ. भाजीपाला म्हणून वापरता येणारे फणस फळ मिळू शकते. या जातींपासून प्रति झाड सरासरी उत्पादन 350-500 किलो पर्यँत मिळतं असल्याचा दावा केला जातो.