Guava Farming : गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांना (Farmer) शेतीमध्ये (Farming) नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत जाणकार लोक शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत आहेत. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी नगदी (Cash Crops) तसेच फळपिकांची शेती (Fruit Farming) सुरू केली तर त्यांना बक्कळ पैसा शेतीतून मिळणार आहे.

मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामात हवामानाच्या लहरीपणामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी अजूनही रिकाम्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना जर फळबाग लागवड करायची असेल तर ते कमी खर्चात सबसिडी घेऊन पेरू लागवड करू शकतात. फळबागेत पेरूच्या बागा शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याच्या ठरणार आहेत.

नवीन पेरूच्या (Guava Crop) बागांची लागवड करण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ असल्याचे जाणकार लोक नमूद करत आहेत. यावेळी, पेरूच्या सुधारित जातींची लागवड केल्यास झाडांची वेगाने वाढ होते. मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, सामान्य तापमान असलेल्या भागात पेरूची लागवड करताना जास्त सिंचन आणि देखभाल खर्च लागत नाही. मात्र असे असले तरी पेरू बागांचे व्यवस्थापन वेळोवेळी केले तरच चांगले उत्पन्न शेतकरी बांधवांना मिळू शकणार आहे.

पेरू लागवडीसाठी अपेक्षित खर्च

जाणकार सांगतात की, पेरू बागेत सर्वाधिक खर्च पहिल्या दोन वर्षांतच होतो. सुमारे एक हेक्टर जमिनीवर पेरूची लागवड करण्यासाठी 10 लाख रुपये खर्च येतो, त्यानंतर प्रत्येक हंगामात प्रति रोप 20 फळे मिळतात, जी कृषी बाजारात 50 रुपये किलो दराने विकली जातात. एका अंदाजानुसार, दोन हंगामात फळांची काढणी केल्यास, एका व्यक्तीला हेक्टरी 25 लाख रुपये मिळू शकतात, त्यानंतर खर्च वजा केल्यास 15 लाख रुपयांचा निव्वळ नफाही मिळू शकतो.

पेरूच्या सुधारित जाती तर जाणून घ्या 

कृषी तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी त्या पिकाच्या सुधारित जातीची शेती केली पाहिजे. अशा परिस्थितीत पेरूच्या सुधारित वाणांची लागवड केल्यास सामान्य वाणांपेक्षा जास्त उत्पादन शेतकरी बांधवांना घेता येणार आहे.

पेरूच्या सुधारित वाणांमध्ये व्हीएनआर बिही, अर्का अमुलिया, अर्का किरण, हिसार सफेदा, हिस्सार सुरखा, सफेद जाम आणि कोहिर सफेद या संकरित वाणांचा समावेश आहे. याशिवाय अॅपल रंग, स्पॉटेड, लखनौ-49, ललित, श्वेता, अर्का मृदुला, सीडलेस, रेड फ्लॅश, पंजाब पिंक, अलाहाबाद सफेदा, अलाहाबाद सुरखा, अलाहाबाद मृदुला आणि पंत प्रभात या जातीही खूप लोकप्रिय आहेत.

कमी खर्चात बंपर उत्पन्न मिळतं बर 

पेरूच्या बागांमधून चांगल्या प्रमाणात फळे येण्यासाठी पेरूची सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला दिला जातो. पूर्वमशागत केल्यानंतर शेतात हेक्टरी 1200 पेरूची रोपे लावता येतील.  साहजिकच, सेंद्रिय पद्धत ही स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ तंत्रज्ञान पद्धत म्हणून ओळखली जाते, परंतु ती आणखी आधुनिक आणि किफायतशीर बनवण्यासाठी पेरू बागांमध्ये ठिबक सिंचनाने सिंचन केले पाहिजे, ज्यामुळे पाण्याची थेंब थेंब बचत होते. तुम्हाला हवे असल्यास पेरू बागांमध्ये जीवामृत आणि कंपोस्ट सोबत कडुनिंबाची पेंड आणि गोमूत्रावर आधारित कीटकनाशके वापरून कमी खर्चात दुप्पट उत्पादन मिळवू शकता.