Goat Rearing: शेळी पालन (Goat Farming) हा एक शेतीमधला व्यवसाय आहे. महाराष्ट्रात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक शतकांपासून शेतीला (Farming) जोड व्यवसाय (Agri Business) म्हणून शेळी पालन करत आले आहेत.

या व्यवसायातून शेतकरी बांधवांना चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) देखील होत आहे. खरे पाहता शेळीपालन व्यवसाय कमी जागेत आणि कमी खर्चात सुरू करता येतो. यामुळे या व्यवसायाकडे आता तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे.

पूर्वी शेळी पालन हा व्यवसाय छोट्या स्तरावर केला जात होता. मात्र आता शेळीपालन व्यवसाय व्यावसायिक स्तरावर केला जाऊ लागला आहे. जाणकार लोक शेळीपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी शेळीच्या सुधारित जातींचे (Goat Breed) संगोपन करण्याचा सल्ला देतात.

जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी आपल्या हवामानात मानवेल अशा जातींचे संगोपन केले पाहिजे. अशा परिस्थितीत आज आम्ही महाराष्ट्रमधील शेळीची एक देशी जात आणि महाराष्ट्रातील हवामानात वेगाने वाढणारी आणि चांगले उत्पादन देणारी जात म्हणजेच उस्मानाबादी शेळी (Osmanabadi Goat) विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो उस्मानाबादी शेळी महाराष्ट्रातील उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील एक प्रमुख शेळीची जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यावरूनच या शेळीला उस्मानाबादी शेळी असे नाव पडले असावे, अशी तज्ञ माहिती देतात. मित्रांनो उस्मानाबाद मध्ये आढळणारी ही शेळी आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. महाराष्ट्रातील हवामान या शेळी साठी उपयुक्त असल्याने या शेळीचे पालन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केले जाते. अशा परिस्थितीत आज आपण या शेळीच्या काही विशेषता जाणून घेणार आहोत.

उस्मानाबादी शेळ्यांची विशेषता:-

  • उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांचा आकार खूप मोठा असतो.
  • साधारणपणे ते काळ्या रंगाचे किंवा काहीवेळा तपकिरी किंवा पांढरे डाग असू शकतात.
  • या जातीच्या शेळ्यांचे कान मध्यम आकाराचे असतात.
  • नर शेळीला शिंगे असतात. सुमारे 50% मादी शेळ्यांना शिंगे असतात, बाकीच्यांना नसतात. या जातीच्या प्रौढ मादी शेळ्यांचे सरासरी वजन 30 किलो असते. आणि नर शेळ्यांचे वजन 35 किलो असते.
  • उस्मानाबादी शेळ्यांची दूध उत्पादन क्षमता कमी आहे.
  • या जातीच्या शेळ्या मांसासाठी पाळल्या जातात.
  • ही शेळी वर्षातून दोनदा किंवा दोन वर्षांतून तीनदा करडाला जन्म देतात. प्रत्येक प्रसूतीला दोन करडाला जन्म देते.