Ginger Farming : मित्रांनो भारतीय शेतीत (Farming) गेल्या अनेक दशकांपासून वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. आता शेतकरी बांधव (Farmer) उत्पादनवाढीच्या अनुषंगाने पिकांच्या सुधारित जातींची लागवड करू लागले आहेत. कोणत्याही पिकाच्या सुधारित वाणाची पेरणी केल्यास त्या पिकातून चांगले दर्जेदार आणि निरोगी उत्पादन मिळत असते. मित्रांनो आले (Ginger Crop) या पिकाच्या बाबतीत देखील काहीसं असंच आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या पिकाच्या सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगली कमाई (Farmer Income) होते. सुधारित जातीच्या आले शेतीसाठी शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च देखील कमी करावा लागतो.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना गाडीत जातींचे आले लागवड केल्यास फायदा मिळतो. आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणार्‍या काही आल्याच्या जातीविषयी (Ginger Variety) जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आले किंवा अद्रकच्या सुधारित जाती.

वरदा :- आल्याची ही एक सुधारित जात असून पेरणी केल्यापासून 200 दिवसात उत्पादन देण्यास तयार होत असल्याचा जाणकार लोकांनी दावा केला आहे. आल्याच्या या सुधारित जातीमध्ये तंतूचे प्रमाण 3.29 ते 4.50 टक्के एवढे असते. या जातीच्या आल्यापासून कोरडा आले किंवा सुंठचे प्रमाण 20.7 टक्के एवढे असते. ही जात प्रति हेक्‍टरी 22 पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. निश्चितच या जातीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

माहीम : या जातीची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हवामानात या जातीची चांगली वाढ होते आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मित्रांनो लागवड केल्यापासून दोनशे दहा दिवसात या जातीच्या आले पिकापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. ही एक मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात असून, आले पिकाला सहा ते बारा फुटवे फुटत असतात. या जातीच्या अद्रक मध्ये सुंठचे प्रमाण 18.7 टक्के असते. आल्याची ही जात प्रति हेक्‍टरी 20 टन एवढे उत्पादन देण्यास सक्षम आहे.

महिमा : ही आल्याची जात अधिक उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. ही जात लागवड केल्यापासून दोनशे दिवसात काढणीसाठी तयार होते. या जातीच्या आले पिकाला 12 ते 13 फुटवे येतात. ही जात सूत्रकृमीस प्रतिकारक आहे. सुंठ प्रमाण 19 टक्के आहे. या जातीपासून प्रति हेक्‍टरी 23 टन उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.