Garlic Farming : सध्या खरीप हंगाम (Kharif Season) सुरू असून येत्या काही दिवसात खरीप हंगामाचा शेवट होणार आहे. अशा परिस्थितीत पावसाळी हंगाम संपल्यानंतर शेतकरी बांधव (Farmer) लसूण पिकाची (Garlic Crop) शेती करून चांगली कमाई (Farmer Income) करू शकणार आहेत.

ऑक्टोबर महिन्याचा कालावधी लसूण लागवडीसाठी अगदी योग्य असल्याचा दावा जाणकार करत आहेत. खरं पाहता, लसणाच्या लागवडीसाठी अति उष्ण हवामान किंवा अति थंड हवामान नसावे. यामुळे ऑक्टोबर महिना हा लसूण लागवडीसाठी योग्य मानला जातो. या ऋतूत लसणाची कंद निर्मिती चांगली होते.

चिकणमाती असलेली जमीन त्याच्या लागवडीसाठी चांगली मानली जात आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात लसणाच्या शेतीला सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने आज आपण लसणाच्या काही सुधारित जाती (Garlic Variety) जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता लसणाच्या काही सुधारित जाती जाणून घेऊया.

लसणाच्या सुधारित जाती

टाईप 56-4: आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की लसणाची ही एक सुधारित जात असून या जातीला पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. या जातीच्या लसणाच्या गाठी लहान असून पांढऱ्या रंगाच्या असतात. प्रत्येक लसणाच्या गाठीत 25 ते 34 पाकळ्या असतात. या जातीची शेती केल्यास शेतकरी बांधवांना फायदा होतो. लसणाची ही सुधारित जात हेक्टरी 150 ते 200 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.

Co.2: लसणाची ही देखील एक सुधारित जात आहे या जातीला तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. या जातीचे कंद पांढरे असून या जातीपासून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते.

IC 49381: ही देखील लसणाची एक सुधारित जात आहे या जातीला भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केली आहे.  या जातीच्या लसणाची शेती केल्यास शेतकऱ्यांना फायदा मिळत असून या जातीचे लसणाचे पीक 160 ते 180 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते. या जातीमुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते.

सोलन: लसणाची ही जात देखील सुधारित जातींच्या लसणांमध्ये समाविष्ट आहे. लसणाची ही सुधारित जात हिमाचल प्रदेश कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. या जातीमध्ये, झाडांची पाने खूप रुंद आणि लांब असतात आणि रंग गडद असतो. प्रत्येक लसनाच्या गाठीत फक्त चार पाकळ्या असतात. पाकळ्या जाड असतात. इतर वाणांच्या तुलनेत ही जात उच्च उत्पन्न देणारी जात आहे.