Dairy Farming Tips : भारतात अगदी शेती (Farming) व्यवसायाच्या सुरुवातीपासून पशुपालन (Animal Husbandry) मोठ्याप्रमाणात केले जात आहे. पशुपालन खरं बघता शेतकरी बांधवांनी (Farmer) अतिरीक्त उत्पन्न (Farmer Income) मिळवण्यासाठी सुरू केलेला व्यवसाय.

मात्र काळाच्या ओघात हा व्यवसाय आता मुख्य व्यवसाय बनू पाहत आहे. पशुपालन व्यवसायातून शेतकरी बांधवांना चांगली कमाई होत असल्याने आता या व्यवसायाचे व्यापक रूप आपल्याला बघायला मिळत आहे. जाणकार लोकांच्या मते, पशुपालन व्यवसायातून चांगल्या कमाईसाठी अधिक दूध उत्पादन (Milk Production) मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधव दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. काही प्रयोग योग्य असतात मात्र काही प्रयोग अयोग्य देखील असू शकतात. अनेक शेतकरी गायीचे दूध वाढवण्यासाठी (How To Increase Cow Milk) हार्मोन्सचे इंजेक्शन देतात, त्यामुळे ती जास्त दूध देऊ लागते. पण असे केल्याने गायींच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण ते दूध सेवन करणाऱ्यांसाठीही घातक ठरू शकते.

त्यामुळे शक्यतोवर दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देशी उपाय व घरगुती उपायांचा वापर करावा. देशी उपाय करून दूध वाढवून जनावरे निरोगी व दीर्घकाळ दूध देतात. असे अनेक घरगुती उपाय आहेत. ज्याचा उपयोग गाई-म्हशींपासून जास्त दूध मिळवण्यासाठी करता येतो.

गायी-म्हशीचे दूध वाढवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies to Increase Cow-Buffalo Milk)

जाणकार लोकांच्या मते, गायीच्या आहारात नेहमी हिरवा चारा आणि कोरडा चारा समाविष्ट करावा.

याशिवाय पशुपालक शेतकरी बांधवांनी त्यांच्या गाईंना रोज चवळीचा हिरवा चारा खायला दिला पाहिजे. त्यामुळे गाईचे दूध वाढत असल्याचा दावा केला जातो. 

सुमारे 200-300 ग्रॅम मोहरीचे तेल आणि सुमारे 250 ग्रॅम गव्हाचे पीठ घ्या. ते चांगले मिसळून संध्याकाळी गायींना खाऊ घाला. मात्र हे जनावराला खाऊ घातल्यानंतर लगेच पाणी देऊ नये. एक आठवडाभर हे काम करा नंतर आहार देणे थांबवा. त्यामुळे गाईचे दूध उत्पादन वाढेल.

कापसाचे बियाणे म्हणजे सरकी देखील जनावरांना देता येते. मात्र 250 ग्रॅमपेक्षा जास्त कापूस बियाणे जनावरांना खाऊ घातल्यास जनावरांमध्ये लठ्ठपणा येतो. त्यामुळे सरकीचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. त्याचबरोबर चाऱ्याचे प्रमाणही जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम करते.

सतावर या औषधी वनस्पती खाऊ घातल्यास गाई-म्हशी अधिक दूध देतात.

गाई-म्हशींना ढेप, बरसीम आणि ज्वारी नेहमी खायला द्यावी. यामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होते.

याशिवाय पशुपालक शेतकरी बांधवांनी जनावरांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, जेणेकरून जनावरांना होणारे आजार कळून त्यावर योग्य वेळी उपचार करता येतील.