Dairy Farming : आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पशुसंवर्धन केले जाते. पशुपालन (Animal Husbandry) प्रामुख्याने दुग्धव्यवसायासाठी केले जाते. जनावरांपासून चांगले दूध मिळवण्यासाठी पशुपालक शेतकरी बांधवांनी (Farmer) जनावरांचे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

जनावरांच्या आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी तसेच त्यांची दूध उत्पादन क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राण्यांची देखभाल, स्वच्छता आणि अन्न यावर खूप लक्ष द्यावे लागेल. जनावरांची (Cow & Buffalo) दूध उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी अनेक जण जनावरांना इंजेक्‍शन व औषधेही देतात, जी जनावरांच्या आरोग्याला घातक ठरू शकतात.

यामुळे जनावरांची दूध उत्पादनक्षमता (Milk Production) वाढविण्यासाठी काही घरगुती उपायांचा अंमल केला पाहिजे. पशुवैद्य देखील दूध उत्पादन वाढविण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला देतात. घरगुती उपाय जनावरांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि यासाठी पशुपालक शेतकरी बांधवांना (Livestock Farmer) वेगळा खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही.

जनावरांच्या चाऱ्याकडे लक्ष द्यावे लागते बर…!

अधिक दूध उत्पादनासाठी, जनावरांच्या चाऱ्याकडे किंवा खुराकाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. फक्त हिरवा चारा किंवा भुसा खाऊन दुग्धोत्पादन वाढवता येत नाही, त्यामुळे पशुखाद्यात गव्हाची लापशी, मक्याचा चारा, सातूचा चारा, कडधान्ये, मोहरी आणि कपाशीची पेंड इत्यादींचा समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञ लोक देत असतात.

असा चारा द्या फायदा होणारं….!

जनावरांना फक्त हिरवा चारा दिल्याने दुधाचे उत्पादन वाढणार नाही, त्यामुळे हिरवा चारा किंवा सुका चारा यासोबतच खनिजे आणि कॅल्शियमचा पुरवठा करावा लागणार आहे. यासाठी पशु तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही जनावरांना प्रो पावडर, मिल्क बूस्टर, मिल्क गेन इत्यादी पशुखाद्य देऊ शकतात.

पशु आहार कसा बनवायचा बर….!

संतुलित आहारानेच जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन सुधारू शकते. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, जनावरास दररोज 20 किलो हिरवा चारा, 4 ते 5 किलो कोरडा चारा आणि 2 ते 3 किलो तृणधान्ये व कडधान्ये यांचे मिश्रण करून जनावरांना खायला द्यावे. यामुळे जनावरांची दूध उत्पादनक्षमता कमालीची वाढत असल्याचा दावा केला जातो.

जनावरांना खायला घालण्यापूर्वी धान्य किमान 4 ते 5 तास भिजत ठेवावे, जेणेकरून जनावरांना अन्न पचण्यास कोणतीही अडचण येत नाही.

पशु तज्ज्ञांच्या मते, चांगल्या फॅट दुधासाठी पशुखाद्यात कॅल्शियम, खनिज मिश्रण, मीठ, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स यांचा पुरवठा करत रहा.

जनावरांना सामान्य हिरवा चारा देऊ नका, तर नेपियर गवत, अल्फा, बरसीम, चवळी, मका या सुधारित जातींचा चाराही द्या.

प्राण्यांच्या आरोग्याची अशी काळजी घ्या बर…!

अनेकदा जनावरांचे आरोग्य बिघडल्याने दूध उत्पादनातही घट होते. याची अनेक कारणे असू शकतात जसे की, जनावरांच्या गोठ्यातील घाण, जनावरांच्या आजूबाजूचा आवाज, जनावरांची अस्वच्छता आणि त्यांची काळजी न घेणे इत्यादी.  अशा परिस्थितीत जनावरांना ताण येतो आणि ते दूध देऊ शकत नाहीत.

रोज सकाळ संध्याकाळ गोठ्याची किंवा जनावरे बांधण्याची जागा साफ करून जनावरांना फिरायला घेऊन जा.

जनावरांच्या गोठ्यातील माश्या व डासांचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी शेणखताची पोळी व कडुलिंबाच्या पानांचा धूर द्यावा. या दरम्यान जनावरांना तबेल्यातून बाहेर काढावे.

जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना दररोज थंड व ताज्या पाण्याने आंघोळ करावी.

अनेकदा जनावरांना पाण्याअभावी दूध उत्पादनही कमी होते, त्यामुळे वेळोवेळी जनावरांना शुद्ध व ताजे पाणी देत ​​राहावे.

दूध उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी हे औषधी उपचार घ्या फायदा होणारं…!

अनेकदा वृद्ध दुभत्या जनावरांमध्येही दूध उत्पादन कमी होऊ लागते. अशा स्थितीत पशुखाद्यासोबत हळद, शतावरी, ओवा, सुंठ, पांढरी मुसळी यांचा देखील जनावरांच्या आहारात समावेश केला जाऊ शकतो. यामुळे जनावरांचे आरोग्य व दुग्धोत्पादन टिकवून ठेवता येईल. हे उपाय जनावरांची प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि जनावरे निरोगी बनवतात. लक्षात ठेवा की या औषधी वनस्पतींचा समतोल प्रमाणातच जनावरांना आहार द्यावा. यासाठी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे लागणार आहे.