Custard Apple Farming : भारतात गेल्या अनेक शतकांपासून फळबाग पिकांची लागवड केली जात आहे. विशेष म्हणजे फळबाग पिकांची शेती (Farming) शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न (Farmer Income) देखील कमवून देत आहे. सीताफळ (Custard Apple) देखील एक प्रमुख फळबाग पीक आहे.

याची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. जाणकार लोकांच्या मते, भारतात सीताफळ पिकाची लागवड (Custard Apple Farming) झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपल्या राज्यात सिताफळ शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

खरं पाहता प्रमुख सीताफळ उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात मराठवाड्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा, नाशिक, सोलापूर खानदेश मधील जळगाव आणि विदर्भातील भंडारा जिल्ह्यात या पिकाची शेती विशेष उल्लेखनीय आहे.

या जिल्ह्यातील शेतकरी बांधव सिताफळ पिकाची शेती करून चांगले उत्पन्न कमवत आहेत. असे सांगितले जाते की, सीताफळ हे फळ भगवान श्रीरामजी यांना वनवासात सीतामातेने भेट म्हणून दिले होते, तेव्हापासून त्याचे नाव सीताफळ पडले. निश्चितच या फळाला ऐतिहासिक महत्त्व मिळाले आहे. या फळाला बाजारात मोठी मागणी असल्याने याची शेती अलीकडे मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

जाणकार लोक शेतकरी बांधवांना सल्ला देताना सांगतात की, सीताफळ पिकातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी (Farmer) यांच्या सुधारित जातींची लागवड केली पाहिजे. अशा परिस्थितीत आज आपण सिताफळ पिकाच्या सुधारित जातींची (Custard Apple Variety) माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

सीताफळ पिकाच्या सुधारित जाती

इतर फळांप्रमाणेच, याच्याही विविध जाती आहेत, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी हे पीक वाढत असल्याने, याची एकही जात प्रत्येक ठिकाणासाठी प्रमाणित केलेली नाही.

बाला नागरल- सीताफळाची ही जात झारखंड प्रदेशासाठी योग्य आहे. त्याची फळे हलक्या हिरव्या रंगाची असून बियांचे प्रमाण जास्त असते. एका हंगामात एका झाडापासून 5 किलोपर्यंत फळे मिळू शकतात.

लाल शरीफा- ही देखील सीताफळची एक जात आहे ज्याची फळे लाल रंगाची असतात आणि दर वर्षी सरासरी 40 ते 50 फळे येतात. या जातीची लागवड बियाणे लावून केल्यानंतर देखील बर्‍याच प्रमाणात याचे उत्पादन सारखेच राहते आणि शुद्धता देखील टिकते.

अर्का सहान- अर्का सहान ही एक संकरित जात आहे, ज्याची फळे इतर जातींपेक्षा जास्त गोड असतात. या जातीची फळे खूप रसाळ असतात आणि खूप हळूहळू पिकतात.