Cucumber Farming: मित्रांनो भारतात काकडीची (Cucumber crop) लागवड गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्यातील शेतकरी बांधव (farmer) देखील आता व्यावसायिक स्तरावर काकडीची शेती (cucumber cultivation) करत आहेत. हेच कारण आहे की राज्यातील कृषी विद्यापीठे (agricultural university) देखील काकडीच्या सुधारित जाती विकसित करत आहेत.

खरं पाहता काकडी हे खरीप हंगामात (kharif season) आणि उन्हाळी हंगामात लावले जाणारे पीक आहे. मात्र असे असले तरी आता पॉलीहाऊस शेतीच्या (polyhouse farming) माध्यमातून काकडीची शेती बारामाही केली जाऊ शकते. कृषी वैज्ञानिक देखील शेतकरी बांधवांना पॉलिहाऊस टेक्निक ने काकडीची शेती करण्याचा सल्ला देतात.

पॉलिहाऊस टेक्निकने काकडीची लागवड केल्यास शेतकरी बांधवांना सुरुवातीला अधिक पैसे खर्च करावे लागत असले तरी यातून मिळणारे उत्पादन देखील अधिक असते. जाणकार लोक शेतकरी बांधवांना काकडीच्या सुधारित जातींची (cucumber variety) शेती करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी काकडीच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया काकडीच्या काही सुधारित जाती.

काकडीच्या काही जाती जाणून घेऊ…! 

पुसा उदय – काकडीची ही एक सामान्य जात आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची व 13 ते 15 सें.मी. लांब, फिकट हिरवी रंगाची असतात. जाणकार लोकांच्या मते, ही जात 50 ते 52 दिवसांत परिपक्व होते. ही जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केली आहे. .

स्वर्ण शीतल – काकडीची ही एक सुधारित जात आहे. या काकडीच्या जातीची फळे मध्यम आकाराची असतात, ही जात 60 ते 65 दिवसांत परिपक्व होते, ही जात 25 ते 30 टन प्रति हेक्टरी उत्पादन देते. कमी दिवसात काढण्यासाठी तयार होणाऱ्या या जातीची देखील आता मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे.

स्वर्ण पूर्णा – काकडीची ही एक प्रगत जात आहे. या जातीची फळे लांब, मध्यम आकाराची आणि हलक्या हिरव्या रंगाची असतात. ही जात 55 ते 60 दिवसांत पक्व होते, ही जात 30 ते 35 टन प्रति हेक्‍टरी उत्पादन देते.

हिमांगी – मित्रांनो काकडीची ही जात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. काकडीची ही प्रगत जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे, या काकडीच्या जातीची फळे पांढर्‍या रंगाची असून कांस्य होण्यास प्रतिरोधक आहेत. त्याचे सरासरी उत्पादन 19 टन प्रति हेक्टर आहे.

फुले शुभांगी – काकडीची ही देखील एक प्रगत जात असून ही जात देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. या जातीची देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती बघायला मिळते. या काकडीच्या जातीचे खोड हलके हिरवे असून फळाचा रंग हिरवा असून फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो. या जातीच्या काकडीचे सरासरी उत्पादन 18 टन प्रति हेक्टर आहे, त्याचे पीक कालावधी 100 ते 110 दिवसांचा आहे. ही जात थोडी उशिरा काढणीसाठी तयार होत असते.