Cow Rearing: खरं पाहता, भारतात दूध व्यवसाय (Dairy Business) लाखो लोकांना रोजगार देतो. दुग्ध व्यवसायात अशा जनावरांची मागणी जास्त असते, जे जास्त दूध देतात. बहुतेक दूध व्यावसायिक गाईला (Cow) दुधाळ प्राणी म्हणून पाळणे पसंत करतात कारण अनेक जातीच्या गायी (Cow Breed) दररोज 50 लिटर किंवा त्याहून अधिक दूध देतात.

याशिवाय गाईचे दूधही खूप पौष्टिक असते, त्यामुळे त्याला बाजारात नेहमीच मागणी असते. जाणकार लोकांच्या मते, जर पशुपालक शेतकरी बांधवांनी गाईंच्या चांगल्या सुधारित जातींचे पालन (Animal Husbandry) केले तर त्यांना त्यापासून चांगले दुग्ध उत्पादन मिळू शकते. अशा परिस्थितीत आज आपण गाईंच्या काही सुधारित जातींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

गुजरातची गीर गाय (Gir Cow):- गीर गाय ही भारतातील सर्वात मोठी दुभती गाय मानली जाते.  ही गाय एका दिवसात 50 ते 80 लिटर दूध देते. या गाईची कासे इतकी मोठी आहे की या गाईचे दूध चार लोक मिळून काढतात. ही गाय गुजरातच्या गीर जंगलात आढळते, त्यामुळे त्यांना गीर गाय हे नाव पडले. भारताव्यतिरिक्त परदेशातही या गायीला मोठी मागणी आहे. या गायी प्रामुख्याने इस्रायल आणि ब्राझीलमध्ये पाळल्या जातात.

साहिवाल गाय (Sahiwal Cow) :- मित्रांनो गाईची ही एक देशी जात आहे. यामुळे या गाईचे भारतात मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. मात्र असे असले तरी ही गाय प्रामुख्याने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आढळते. या गायी वर्षाकाठी 2000 ते 3000 लिटर दूध देतात. त्यामुळे दुग्ध उत्पादन करणारे पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात या गाईचे पालन करत असतात. ही गाय आई झाल्यानंतर सुमारे 10 महिने दूध देते.

लाल सिंधी गाय (Lal Sindhi Cow) :- लाल सिंधी गाय ही भारतात उच्च दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. पूर्वी ही गाय फक्त सिंध परिसरातच आढळत होती. त्यांच्या लाल रंगामुळे त्यांना लाल सिंधी गाय हे नाव पडले. पण आता ही गाय पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशामध्येही आढळते.  साहिवाल गायींप्रमाणेच लाल सिंधी गायी देखील वर्षाला 2000 ते 3000 लिटर दूध देतात.

राठी गाय (Rathi Cow) :- राजस्थानातील गंगानगर, बिकानेर आणि जैसलमेर भागात राठी गाय आढळते. आजकाल गुजरातमध्येही या गायी पाळल्या जात आहेत. राठी गाय ही जात जास्त दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही गाय दररोज 6-8 लिटर दूध देते. काही ठिकाणी दररोज 15 लिटरपर्यंत दूध देताना दिसून येत आहे. प्रौढ राठी गायीचे वजन सुमारे 280-300 किलो असते.