Cotton Market Price : कापूस नगरी जळगाव मधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmer) अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता कापूस उत्पादक शेतकरी बांधवांपुढे (Cotton Grower Farmer) एक ना अनेक संकटे गेल्या अनेक वर्षांपासून उभे राहत आहेत.

मात्र गत वर्षी कापसाला (Cotton Crop) चांगला ऐतिहासिक बाजारभाव (Cotton Rate) मिळाला असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. यावर्षी देखील गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली असून खरेदीच्या पहिल्याच दिवशी कापसाला ऐतिहासिक बाजार भाव मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. मित्रांनो कापसाची लागवड (Cotton Farming) राज्यात सर्वाधिक जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) बघायला मिळते.

खरं पाहता खानदेश मधील इतर दोन जिल्ह्यात म्हणजेच धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील कापसाची लागवड केली जाते मात्र त्याचे प्रमाण जळगाव जिल्ह्यापेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत जळगावला कापूस नगरी किंवा कापसाचे गोदाम म्हणून देखील संबोधले जाते. याच कापसाच्या गोदामातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे कापूस खरेदी च्या पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळाला आहे. फक्त बोदवड मध्येच नाही तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या ठिकाणी कापसाला 14 हजार 772 रुपये असा बाजार भाव मिळाला आहे. यामुळे कापूस नगरी जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रातील तमाम कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी येत असून यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भुवया उंचावल्या असल्याचे चित्र आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुका हा कापसाच्या शेतीसाठी विशेष ओळखला जातो. या तालुक्यात बुधवारी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी कापसाच्या हंगामाची सुरुवात जोरदार झाली आहे. बोदवड येथील वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला आहे. यामध्ये मुहूर्ताच्या कापसाला 16 हजाराचा भाव मिळाला आहे.

मित्रांनो सातगाव डोंगरी येथिल देखील कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी कापूस व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकार या दोन व्यापाऱ्यांनी 14 हजार 772 रुपये भावाने कापसाची खरेदी केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील धरणगाव या ठिकाणीदेखील कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. जळगाव येथील श्री जिनींग मध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली असून कापसाला अकरा हजार 153 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. एकंदरीत यावर्षी कापूस खरेदी जोरदार सुरु झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात कापसाला मिळाला आतापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव

मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील बोदवड या ठिकाणी सोळा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला बाजार भाव मिळाला आहे. सातगाव डोंगरी या ठिकाणी 14 हजार 772 रुपये एवढा बाजार भाव कापसाला मिळाला आहे. बाळद या ठिकाणी हजार 551 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव कापसाला मिळाला आहे. धरणगाव येथे कापसाला 11 हजार 153 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. कासोदा येथे 11 हजार 11 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. कजगाव या ठिकाणी देखील कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे.