Cotton Farming: सध्या संपूर्ण देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरु आहे. शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन करण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो आपल्या देशात खरीप हंगामात सोयाबीन (Soybean crop) आणि कापूस (Cotton Crop) या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आपल्या राज्यात देखील सोयाबीन आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र खूपच जास्त आहे.

कापसाची शेती (Cotton Cultivation) राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या वाचत शेतकरी मित्रांसाठी कापसाच्या पिकाचे कशा पद्धतीने व्यवस्थापन (Cotton Crop Management) करायचे याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण कापूस पिकावर कीटक व रोगांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

कपाशीवरील कीड-रोग व्यवस्थापन

रूट रॉट रोग

राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते. ऑगस्टमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर मुळांच्या कुजण्याच्या रोगाचे प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. यामुळे पीक निकामी होण्याचा धोका असतो. या रोगात झाडांची मुळे कुजायला लागतात आणि सालाखाली पिवळे पदार्थही साचू लागतात. अशा परिस्थितीत या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक आहे. जाणकार लोकांच्या मते, कपाशीची लवकर पेरणी केल्यास हा रोग होण्याची दाट शक्यता असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्वाचे ठरते. त्यासाठी व्हिटाव्हेक्स 0.1% टक्के आणि ब्लाइटॉक्स 0.3 टक्के प्रतिकिलो घेऊन बियाण्यांवर प्रक्रिया केल्यानंतरच लागवड करावी.

लीफ रॅप कीटक

जाणकार लोकांच्या मते, पानांचे सुरवंट कापसाच्या पानांना गुंडाळून कवच बनवतात आणि चघळायला लागतात. त्यामुळे या किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणी करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत केली गेली पाहिजे. यासाठी खोल नांगरणी करूनच पेरणी करावी. याबरोबरच शेतकरी बांधवांनी कापूस पिकाचे सतत निरीक्षण करत राहिले पाहिजे आणि पिकातील अळ्या दिसताच गोळा करून नष्ट केल्या पाहीजेत. पिकामध्ये पाने गुंडाळणाऱ्या किडीची लक्षणे दिसल्यास, शेतात एग पॅसिटॉइड ट्रायकोग्रामा 1.5 लाख प्रति हेक्टर या प्रमाणात वापरा.

पांढरी माशी

असे सांगितले जाते की, जून-जुलैमध्ये लागवड केलेल्या कापूस पिकावर ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक असतो. जाणकार लोकांच्या मते, या माश्या कापूस पिकातील रस शोषून कापसाचा दर्जा खराब करतात. जेव्हा प्रादुर्भाव दिसून येतो तेव्हा वैज्ञानिक उपाय म्हणून मेटासिस्टॉक्स 25 ईसी. आणि एक लिटर कडुनिंब आधारित कीटकनाशक फवारणी किंवा सेंद्रिय कीटकनाशकांच्या स्वरूपात डायमेथोएट 30 ईसी. 300 मिली 250 लिटर पाण्यात मिसळून एकरी पिकावर फवारणी करावी.

मित्रांनो इथे दिलेली माहिती ही अंतिम नसून कोणत्याही प्रकारची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा किंवा कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक राहणार आहे.