Chilli Farming: भारतात मिरची (Chilli Crop) एक प्रमुख मसाला वर्गीय आणि भाजीपाला पीक (Vegetable Crop) म्हणून ओळखले जाते. शेतकरी बांधव या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) करत आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांनी (Farmer) देखील मिरची पिकाची लागवड (Cultivation Of Chilli) केली आहे.

मिरचीचे पीक कमी खर्चात आणि कमी दिवसात काढण्यासाठी तयार होत असल्याने या पिकाची शेती शेतकरी बांधवांसाठी फायद्याचा सौदा ठरत असल्याचा दावा जाणकार लोकांकडून केला जात आहे. मिरची पिकासाठी कमी खर्च येत असला तरी देखील पिकाची काळजी घेणे तसेच पीक व्यवस्थापन (Chilli Crop Management) करणे अतिशय महत्त्वाचे असते.

मिरची पिकात इतर भाजीपाला पिकाप्रमाणे वेगवेगळ्या किडींचे सावट बघायला मिळते. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मिरची पिकावर प्रामुख्याने प्रादुर्भाव होत असलेल्या दोन पिकांची माहिती तसेच नियंत्रण पद्धतीबद्दल महत्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो आज आपण तुडतुडे तसेच पांढरी माशी या दोन किडींवर कशा पद्धतीने नियंत्रण (Pest Control) मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेऊया. मित्रांनो मिरची पिकावर या दोन किडींमुळे विपरीत परिणाम होतो आणि उत्पादनात मोठी घट होते अशा परिस्थितीत वेळेवर या दोन किडींवर नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक बनते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या दोन किडींवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

मिरची पिकावरील तुडतुडे कीटक 

तुडतुडे कीटकांचे प्रौढ व पिले मिरची पिकातील पानांचा रस शोषून घेतात. यामुळे मिरची पिकातील अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो. पिकाला व्यवस्थित पोषण मिळत नाही.

जाणकार लोकांच्या मते, या किडीचा मिरची पिकावर जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात तसेच मिरचीच्या झाडांची वाढ खुंटते. परिणामी उत्पादनात मोठी घट होते. अशा परिस्थितीत या कीटकांवर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक आहे.

तुडतुडे कीटकांवर नियंत्रण कसं मिळवणार बरं..! 

मित्रांनो तुडतुडे कीटकांवर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते. यासाठी शेतकरी बांधव पायरीप्रॉक्सिफेन (10 टक्के ई.सी.) 1 मिलि किंवा ब्रोफ्लॅनिलीड (20 टक्के एस.सी.) 0.25 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (70 टक्के डब्ल्यू.एस.) 0.7 मिलि या औषधांची फवारणी करु शकतात.

मिरची पिकावरील पांढरी माशी

मिरची पिकावर पांढरी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. ही देखील कीड मिरची पिकाच्या पानांतील रस शोषण करते. यामुळे पाने पिवळी पडून करपली जातात. यामुळे मिरची पिकावर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादनात घट होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत या कीटकांवर देखील वेळेवर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे ठरते.

पांढरी माशी कीटकांवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवणार बरं…!

पांढरी माशी किटकावर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधव फेनप्रोपॅथ्रीन (30 टक्के ई.सी.) 0.5 मिलि किंवा हॅक्झिथिअझोक्स (3.5 टक्के) अधिक डायफेन्थुरॉन (42 टक्के डब्ल्यू.डी.जी.) (संयुक्त कीटकनाशक) 1.5 ग्रॅम या औषधांची फवारणी करु शकतात.

मित्रांनो कोणत्याही पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा, कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. येथे आम्ही दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही याची दखल घ्यावी.