Business Idea : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये (Farming) मोठा बदल केला जात असून फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जात आहे. फळबाग पिकांमध्ये आता विदेशी फळांची देखील मोठ्या प्रमाणात शेती होत असल्याचे चित्र आहे.

मित्रांनो किवी (Kiwi Crop) हे देखील असच एक विदेशी फळ पीक असून या पिकाची आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात शेती (Kiwi Farming) केली जात आहे. खरं पाहता किवी हे एक चिनी फळ आहे. या फळाची आपल्या देशातील नागालँड या राज्यात सर्वाधिक लागवड केली जाते.

देशातील इतरही भागात या फळाची आता शेती बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पिकाच्या शेती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता आज जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

किवी शेतीसाठी उपयुक्त हवामान आणि शेतजमीन 

जाणकार लोक नमूद करतात की, जास्त तापमान असलेल्या भागात किवीची लागवड करता येत नाही. जिथे बहुतांशी थंड हवामान असते, तिथे या फळाची लागवड होते. जेथे तापमान साधारणपणे 30 अंशांच्या वर जात नाही तेथे किवीची लागवड करता येते. देशातील डोंगराळ आणि थंड हवामान असलेल्या राज्यात शेतकरी त्याची लागवड करत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, अन्न प्रक्रिया मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणतात की, नागालँड आणि इतर ईशान्येकडील राज्ये किवीसारख्या विदेशी फळांच्या उत्पादनात चांगली भूमिका बजावत आहेत.

किवी उत्पादनामुळे येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच फळबागांचे क्षेत्रही विस्तारले आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. नागालँडला ‘किवी राज्य’चा दर्जा मिळायला हवा, असे ते म्हणाले. या दिशेने काम करण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.  किवी लागवडीसाठी जानेवारी महिना सर्वोत्तम आहे. असे क्षेत्र लागवडीसाठी योग्य आहेत, ज्यांची उंची समुद्रसपाटीपासून 1000 ते 2000 मीटर दरम्यान आहे आणि तेथील हवामान सौम्य उप-उष्णकटिबंधीय आणि सौम्य समशीतोष्ण आहे.

वर्षभरात सरासरी 150 सेमी पाऊस असावा. हिवाळ्यात तापमान 7 डिग्री सेल्सियस पर्यंत असावे. चांगला निचरा होणारी, खोल, सुपीक, चिकणमाती वालुकामय चिकणमाती असलेली जमीन किवी बागकामासाठी योग्य आहे. ज्या जमिनीत किवी लागवड करायची आहे त्या जमिनीचे pH मूल्य 5.0 ते 6.0 दरम्यान असावे. किवी कलमांची लागवड करण्यासाठी, वाळू, कुजलेले खत, माती, लाकूड भुसा आणि कोळसा पावडरसाठी 2:2:1:1 चे गुणोत्तर योग्य आहे.

किवी लागवड कशी करावी 

किवीच्या लागवडीमध्ये रोपापासून रोपापर्यंतचे अंतर 6 मीटर आणि एका ओळीपासून दुसऱ्या ओळीपर्यंतचे अंतर 4 मीटरपर्यंत ठेवावे. यामध्ये प्रत्येक 9 मादी रोपांसाठी एक नर रोप लावावे लागते. एक हेक्टरमध्ये सुमारे 415 रोपे लावता येतात.

किवी शेतीसाठी पाणी व्यवस्थापन 

उन्हाळ्यात किवीला जास्त पाणी लागते. उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. किवी फळ उत्पादनाच्या सुरुवातीच्या अवस्थेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सिंचन देखील करावे.

भारतातील किवीच्या प्रमुख प्रजाती

देशात उगवल्या जाणाऱ्या किवीच्या जाती हेवर्ड, अॅबॉट, अॅलिसन, मॉन्टी, तुमयुरी आणि बुरान आहेत. यामध्ये सर्वाधिक मागणी हेवर्ड जातीची आहे.

जाणकार लोक सांगतात की, एक हेक्टर शेतजमिनीत किवी फळाची लागवड केल्यास शेतकरी बांधवांना जवळपास 24 लाखांची कमाई होऊ शकते. जे की पारंपरिक पिकांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे