Business Idea: मित्रांनो आपल्या देशात एकूण तीन हंगामांत शेती (Farming) केली जाते. खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामात प्रामुख्याने शेतकरी बांधव (Farmer) शेती (Agriculture News) करत असतात. या तीन हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करून लाखो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया साधतात. पारंपारिक पिकांबरोबरच शेतकरी बांधव या तिन्ही हंगामात भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable Crop) देखील शेती करत असतात. खरं पहाता भाजीपाला वर्गीय पिके काही महिन्यातच शेतकरी बांधवांना लाखोंचे उत्पन्न मिळवून देत असल्याने शेतकरी बांधव आता भाजीपाला लागवडीकडे वळत असल्याचे चित्र आहे.

आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील अल्पकालावधीत आणि कमी खर्चात काढणीसाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकाची शेती मोठ्या प्रमाणात करत आहेत. मित्रांनो कोथिंबीर हे देखील असेच एक भाजीपाला वर्गीय पीक आहे. विशेष म्हणजे कोथिंबीर पिकाची (Coriander Crop) पावसाळ्यात शेती करून शेतकरी बांधव काही महिन्यातच चांगले उत्पन्न कमावतात. सध्या कोथिंबीर पिकाला बाजारात चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधव अल्पकालावधीतच लाखों रुपयांचे धनी होत आहेत.

नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याला अवघ्या तीन ते चार एकर क्षेत्रावर असलेल्या कोथिंबीर पिकातून तब्बल साडे अकरा लाख रुपयांची कमाई झाली आहे. त्यामुळे सध्या कोथिंबीर पीक लागवडीकडे (Coriander Farming) शेतकऱ्यांचा मोर्चा वळला आहे. अशा परिस्थितीत आज आपण देखील कोथिंबीर शेतीमधील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कोथिंबीर लागवडीसाठी शेत कसे तयार करावे

जाणकार लोकांच्या मते, कोथिंबीर लागवड करण्यासाठी शेताची योग्य नांगरणी केल्यानंतर योग्य प्रमाणात डीएपी आणि पोटॅशचा वापर करून रोटाव्हेटरने शेताची नांगरणी करून माती बारीक केली पाहिजे. यानंतर शेतकरी बांधवांनी कोथिंबीर पिकाची पेरणी केली पाहिजे. यासाठी शेतकरी बांधवांनी कोथिंबीर पिकाच्या सुधारित बियाण्याचा वापर केला पाहिजे. सुधारित बियाणांची पेरणी केल्यास पेरणीनंतर कोथिंबीर काही दिवसातच उगवते. पावसाळ्याच्या दिवसात शेतकरी बांधवांनी वरंबा किंवा गोट बांधून कोथिंबीर पेरली पाहिजे. कोथिंबीर पेरण्यापूर्वी त्याच्या बिया चार दिवस आधी तागाच्या गोणीत भिजवल्या जातात. यामुळे कोथिंबीर लवकर अंकुरण पावत असल्याचा दावा केला जातो.

कीड रोखण्यासाठी शेतकरी बांधवांनी जाणकार लोकांच्या तसेच कृषी तज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसात ओलाव्यामुळे अनेक प्रकारचे कीटक झाडांचे नुकसान करतात. त्याच्या प्रतिबंधासाठी क्लोरोपायरिफॉस नावाच्या औषधाची योग्य प्रमाणात द्रावण तयार करून फवारणी केली जाते. पाऊस पडल्यानंतर ही कोथिंबीर बाजारात जाण्यासाठी तयार होते.  पावसाळ्याचे दिवस सुरू होण्यापूर्वी लागवड केलेली कोथिंबीर बाजारात आली असून, आता त्याची चांगल्या दराने विक्री होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी योग्य वेळी कोथिंबीर पेरली तर निश्चितच त्यांना फायदा होणार आहे.

एक हेक्टरमध्ये 10 क्विंटल हिरवी कोथिंबीर उत्पादन मिळते 

जाणकार लोकांच्या मते, शेतकरी कोथिंबिरीच्या लागवडीतून लाखोंचा नफा कमावत आहेत. सध्या कोथिंबिरीच्या लागवडीमुळे शेतकऱ्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळत आहे. एक हेक्टरमध्ये सुमारे 10 क्विंटल हिरवी कोथिंबीर मिळते. कोथिंबीरीला बाजारात मोठी मागणी आहे. हे मसाला म्हणूनही वापरले जाते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने कोथिंबीर लागवड केल्यास त्यांना निश्‍चितच फायदा होणार आहे.