Business Idea : भारतात गेल्या अनेक दशकांपासून नगदी पिकांची (Cash Crops) शेती (Farming) केली जात आहे. राजगिरा (Amaranth Crop) हे देखील असच एक नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. याची लागवड अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी (Farmer) खूप फायदेशीर आहे, कारण राजगिरा कमी जमिनीत लागवड केल्यासही चांगले उत्पन्न मिळते.

राजगिरा पासून मिळणारी हिरव्या भाजी आणि राजगिरा धान्य ही दोन्ही नगदी पिके आहेत. जाणकार लोकांच्या मते, साधारण चार महिन्यांत राजगिरा पीक तयार होते. त्याचे रोप एक ते दोन मीटर उंचीपर्यंत वाढते आणि त्यावर लाल आणि जांभळ्या रंगाची फुले येतात.

या लेखात आम्ही तुम्हाला राजगिरा लागवडीशी (Amaranth Farming) संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया राजगिरा शेतीशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी.

राजगिरा लागवडीसाठी अनुकूल हवामान

या पिकाची लागवड थंड प्रदेश वगळता संपूर्ण भारतवर्षात करता येते. उन्हाळा आणि पावसाळ्यात याची लागवड करता येते. मात्र उन्हाळी पीक पावसाळी पिकांच्या तुलनेत चांगले उत्पादन देते, कारण उन्हाळी राजगिरा पिकात पाणी साचणे किंवा जास्त पाणी होणे यासारख्या समस्या उद्भवत नाही. उन्हाळी राजगिरा फेब्रुवारीच्या शेवटी लावला जातो तर ऑगस्ट-सप्टेंबर हा काळ पावसाळी पिकासाठी योग्य असतो.

सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या शेतात राजगिरा चांगले उत्पादन देते. त्यामुळेच पेरणीसाठी शेत तयार करताना सेंद्रिय किंवा शेणखताचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. राजगिरा बियांची लागवड फवारणी आणि ड्रिल दोन्हीद्वारे केली जाते. फवारणी पद्धतीत तयार केलेल्या शेतात बियाणे फवारल्यानंतर किंवा फोकून झाल्यानंतर, एकवेळ हलकी नांगरणी कल्टिव्हेटरमध्ये हलकी पॅड बांधून केली जाते. जेणेकरून बिया चांगल्या प्रकारे जमिनीत गाडल्या जातील. तर ड्रिल पद्धतीने बिया ओळीत पेरल्या जातात. ओळींमध्ये अर्धा फूट अंतर असावे. दोन्ही पद्धतींमध्ये बिया 2-3 सेमी खाली गाडल्या जातात. फवारणी पद्धतीने बीयाणाचा वापर 60-65% जास्त होतो. पेरणी करण्यापूर्वी बियांवर गोमूत्राची प्रक्रिया केल्यास फायदा होतो.

राजगिरा पिकवण्यासाठी जास्त पाणी लागत नाही. म्हणूनच जेव्हा शेतातील ओलावा कमी होताना दिसतो तेव्हाच पाणी द्यावे. तथापि, हिरव्या भाज्यांसाठी राजगिरा पाने तोडल्यानंतर पिकाला थोडे अधिक पोषण आवश्यक असते. अशा वेळी सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा वापर आणि हलके सिंचन फायदेशीर ठरते. चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पिकाचे तण आणि किडींपासून संरक्षण करणे देखील आवश्यक आहे. संपूर्ण कापणीच्या वेळी शेतात दोनदा निंदणी करावी. खुरपणी किंवा निंदणी करतांना झाडांच्या मुळांनाही हलकी माती लावावी. लावणीनंतर 30 ते 40 दिवसांनी राजगिऱ्याच्या हिरव्या पानांची काढणी करावी. पीक पूर्ण होईपर्यंत पाने तीन ते चार वेळा काढता येतात.

राजगिरा पिकातून मिळणारे उत्पन्न

राजगिरा लागवडीसाठी एकरी 200 ग्रॅम बियाणे लागते. बियाणांची किंमत सुमारे 75 ते 80 रुपये आहे. पीक परिपक्व झाल्यावर एकरी 3 ते 4 क्विंटल राजगिराचे उत्पादन मिळते.  बाजारात 75 ते 80 रुपये किलोने विकले जाते. म्हणजेच एकरी 30 हजार रुपये उत्पन्न मिळते. म्हणूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी या पिकाची अतुलनीय मानले जाते. राजगिरा पेरल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर त्याची पानेही तोडली जातात. त्याची विक्री करून अधिक उत्पन्नही मिळते. निश्चितच राजगिरा पिकांतून मिळणाऱ्या पानांच्या तसेच राजगिरा बियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना डबल काम होणार आहे.