Brinjal Farming: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) केली जात आहे. वांगे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक (Vegetable Crop) आहे. विशेष म्हणजे वांग्याची शेती (Brinjal Farming) शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायद्याची ठरत आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer Income) देखील मोठ्या प्रमाणात वांगी या भाजीपाला पिकाची (Brinjal Crop) आता शेती करत आहेत, आणि वांग्याच्या शेतीतून लाखों रुपये उत्पन्न कमवण्याची किमयाही साधत आहेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, याच्या शेतीतून लाखो रुपये उत्पन्न कमवण्यासाठी शेतकरी बांधवांनी याच्या सुधारित जातींची लागवड (Brinjal Variety) करणे अतिशय आवश्यक राहणार आहे.

कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित जातींची निवड करणे अतिशय आवश्यक असते. अशा परिस्थितीत वांग्याची जर शेती करायची असेल तर शेतकरी बांधवांनी वांग्याच्या देखील सुधारित जातींची पेरणी करणे अतिशय आवश्यक राहणार आहे. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी वांग्याच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, क्षेत्र आणि उत्पादनाच्या दृष्टीने वांगी ही सर्वात महत्त्वाची भाजीपाला पिकं आहे. वांग्याची भाजी वेगवेगळ्या हवामानात घेतली जाते आणि म्हणून वांग्याची शेती देशभर केली जाते. गेल्या 15-20 वर्षात संशोधनातून वांग्याच्या अनेक सुधारित आणि संकरित वाण विकसित करण्यात आल्या आहेत. पुसा पर्पल क्लस्टर, पुसा पर्पल राऊंड, पुसा पर्पल लाँग आणि पुसा हायब्रीड-6 इत्यादी या सुधारित जाती आहेत.

वांग्याच्या सुधारित जाती:-

पुसा पर्पल लॉन्ग जात :- जाणकार लोकांच्या मते, वांग्याची ही एक सुधारित जात असून उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाबमध्ये वांग्याची ही जात सामान्यतः उत्पादीत केली जाते. या प्रकारची वांगी लांब आणि चमकदार आणि फिकट जांभळ्या रंगाची असतात. त्याची उत्पादन क्षमता 25-27 टन प्रति हेक्टर आहे.

पुसा पर्पल क्लस्टर जात:- ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था,नवी दिल्ली यांनी विकसित केली आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची असून त्यांची उंची 10-12 सें.मी. आहे. ही फळांसह उच्च उत्पन्न देणारी, जिवाणू विल्ट प्रतिरोधक वांग्याची जात आहे. गडद जांभळ्या रंगाची आयताकृती फळे गुच्छांमध्ये तयार होतात.

पुसा पर्पल राऊंड वाण:- या जातींचे वांगे आकाराने गोल आणि जांभळ्या रंगाच्या असतात, त्यांचे सरासरी वजन 130-140 ग्रॅम असते. हिरव्या-जांभळ्या रंगाच्या जाड देठांसह झाडे खूप उंच असतात.