Brinjal Farming : भारतात गेल्या अनेक शतकांपासून भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) केली जात आहे. वांगे (Brinjal Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक (Vegetable Crop) असून या पिकाची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली.

रिपोर्ट नुसार वांगी उत्पादनात (Brinjal Production) भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अशा परिस्थितीत देशातील बहुतांशी शेतकरी (Farmer) वांग्याची शेती करत असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातही या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. मित्रांनो भारतात वांग्याची लागवड सर्वत्र होते मात्र डोंगराळ भागात यांची शेती केली जात नाही.

भारतातील पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात वांग्याची शेती केली जाते. मित्रांनो जाणकार लोक सांगतात की वांग्याची शेती शेतकऱ्यांना निश्चितच फायद्याची सिद्ध होणार आहे मात्र यासाठी शेतकरी बांधवांना काही गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन देखील केले जाते.

मित्रांनो जाणकार लोक सांगतात की शेतकरी बांधवांनी तज्ञांच्या सल्ल्याने योग्य जमिनीत आणि योग्य हवामानात वांग्याची शेती केल्यास त्यांना निश्चितच चांगली कमाई होणार आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी वांग्याची शेती कोणत्या जमिनीत तसेच कोणत्या हवामानात केली पाहिजे याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत.

वांग्याची लागवड कोणत्या काळात आणि हवामानात करावी?

वांग्याची लागवड साधारणपणे वर्षातून तीनदा करता येते. फेब्रुवारीमध्ये पेरणी केली तर पावसाळ्यात झाडांना फळे येऊ लागतात. जून-जुलैमध्ये पेरणी करणेही योग्य मानले जाते. नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यास, फेब्रुवारीमध्ये फळे दिसू लागतात. 17 ते 21 अंश सेल्सिअस सरासरी तापमान याच्या यशस्वी उत्पादनासाठी सर्वात अनुकूल आहे. जेव्हा तापमान 17 अंशांपेक्षा कमी होते तेव्हा पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होतो.

वांग्याची लागवड कोणत्या शेतीजमिनीत करावी?

चांगल्या पाण्याचा निचरा असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत याची लागवड करता येते. मात्र, चिकणमाती असलेल्या जमिनीत वांग्याची लागवड सर्वोत्तम मानली जाते. जड माती, ज्यात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण पुरेसे असते, अशी जमीन देखील याच्या शेतीसाठी योग्य मानली गेली आहे. जमिनीचे pH मूल्य 5.5-6.6 च्या दरम्यान असावे. यामध्ये सिंचनाचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. झारखंडची जमीन वांग्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे आढळून आले आहे.

मात्र असे असले तरी आपल्या महाराष्ट्रातील हवामान तसेच शेत जमिन देखील वांग्याच्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे आपल्या महाराष्ट्रात देखील वांग्याची शेती शेतकऱ्यांना अधिक फायद्याची ठरत आहे. वांग्याची पेरणी झाल्यानंतर साधारण 130 दिवसांत फळे पहिल्या तोड्यासाठी तयार होतात. 8-10 दिवसांच्या अंतराने फळे तोडली जातात. वांग्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी 20 ते 30 टन असते.