Black Gram Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून दाळवर्गीय पिकांची म्हणजे कडधान्य पिकांची (Pulses Crop) लागवड करत आहेत. उडीद (Black Gram Crop) हे देखील एक प्रमुख कडधान्य पीक आहे.

या पिकाची शेती आपल्या महाराष्ट्रात देखील केली जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की उडीदडाळ या पिकाची शेती (Farming) प्रामुख्याने देशातील मैदानी प्रदेश जसे की, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि राजस्थानमध्ये केली जाते. मात्र या पिकाचा वापर मेंदू वडा, इडली, डोसा इत्यादी बनवण्यासाठी मुख्य घटक म्हणून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो.

उडीद हे मुख्य कडधान्य पीक आहे आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून शेतकरी बांधव चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) करत आहेत. मात्र असे असले तरी उडीद या कडधान्य पिकाच्या सुधारित जातींची (Black Gram Variety) लागवड केली तरच शेतकरी बांधवांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळणार आहे.

जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना उडीद या पिकाच्या सुधारित जातींची शेती करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी उडीद या पिकांच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया उडीद या कडधान्य पिकांच्या काही सुधारित जाती.

पंत U-19- उडीद या कडधान्य पिकांची ही एक सुधारित जात आहे. ही जात 10-12 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.

पंत U-30 :- ही देखील उडीद पिकाची सुधारित जात आहे. जाणकार लोकांच्या मते, हे वाण 75-80 दिवसांत तयार होते, हेक्टरी 10-12 क्विंटल उत्पादन देण्यास ही जात सक्षम असल्याचा त्यांचा दावा आहे.

कृष्णा- उडीदची ही एक प्रगत जात आहे. या जातीची लागवड भारी जमिनीतं केल्यास यापासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येते. ही जात सुमारे 10-12 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळवून देत असल्याचा दावा केला जातो.

खरगोन- उडीदची ही जात सुमारे 80 दिवसांत तयार होणारी जात म्हणून ओळखली जाते. ही जात 12-15 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन देत असल्याचा दावा केला जातो.

T-9-19- या जातीच्या उडीदचे दाणे जाड व काळे असतात. चिकणमाती असलेल्या जमिनीत या जातीची शेती करण्याची शिफारस केली जाते. जाणकार लोकांच्या मते, ही जात प्रति हेक्टर सुमारे 9-13 क्विंटल देते.

KU 96-3-  या जातीच्या उडीद डाळीचे दाणे लहान व काळे असतात. यापासून हेक्टरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळते.

जवाहर उडीद 2- उडीद डाळीच्या या जातीचे दाणे मोठे व काळे असून ते सरासरी 13 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन देते.

शेखर 2- ही उडीदाची एक अतिशय प्रगत जात मानली जाते, ज्याचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 10-14 क्विंटल असते.