Banana Farming: भारत हा एक प्रमुख केळी (Banana Crop) उत्पादक देश आहे. आपल्या राज्याचा देशाच्या एकूण केळी उत्पादनात मोठा वाटा आहे. खरं पाहता आपल्या भारतात केळीचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. यामुळे बाजारात केळीला कायम मागणी असते. अशा परिस्थितीत केळीची लागवड (Banana cultivation) शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, याच्या शेतीतून (Farming) चांगले उत्पादन (Farmer Income) घेण्यासाठी व्यवस्थापनाचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: पावसाळ्यात केळीची पाने व फळे कुजण्याची समस्या निर्माण होते, त्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत या वेळी केळी बागांची (Banana Orchards) विशेष काळजी घेतली पाहिजे.

केळीमध्ये एक रोग (Banana Disease) प्रमुख आहे तो म्हणजे केळीतील बंची टॉप व्हायरस जो केळीच्या पानांवर पसरून गुच्छाचा आकार बनतो आणि केळी पिकाचा नाश करतो. या विषाणूमुळे झाडांची वाढ खुंटते आणि केळीच्या झाडाला फळे लागत नाहीत. ओरिसा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये या विषाणूची सर्वाधिक लक्षणे दिसतात.

आपल्या राज्यातील केळी बागावर सुद्धा हा रोग बघायला मिळतो. अशा परिस्थितीत या रोगावर वेळेत नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. यामुळे आज आपण या रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

केळीमध्ये बनची टॉप व्हायरस कमी करण्यासाठी उपाय

केळी पिकामध्ये हा रोग टाळण्यासाठी पिकामध्ये सतत देखरेख व व्यवस्थापनाचे काम शेतकरी बांधवांना (Farmer) करावे लागणार आहे. जेणेकरून विषाणूंचा प्रादुर्भाव रोखता येईल. अशा परिस्थितीत वैज्ञानिक उपायांच्या मदतीने रोग नियंत्रण कसे करायचे हे आज आपण पाहूया.

कीड-रोग नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार 1 मिली प्रमाणित कीटकनाशक किंवा इमिडाक्लोप्रिड 2 लिटर पाण्यात मिसळून केळीच्या पानांवर फवारणी करावी.

केळीच्या आजूबाजूच्या बागांमध्येही रोग नियंत्रणाचे काम एकाच दिवसात करावे, जेणेकरून हा विषाणू जवळपासच्या बागांमध्येही पसरणार नाही, हे लक्षात ठेवा.

केळीच्या बागांमध्ये वाढणारे तण उपटून टाकावे आणि बंचीच्या रोगाने प्रादुर्भाव झालेली झाडे मुळासकट काढून टाकावीत.

याशिवाय केळीवरील कीड व रोगांच्या प्रतिबंधासाठी केवळ सुधारित वाणांचीच निवड करावी.