Agriculture News: मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील शेती व्यवसायात (Farming) आता काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे.

खरं पहाता सुरुवातीच्या टप्प्यात शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीची कामे (Agriculture Work) करताना नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. सुरुवातीला शेतीमध्ये खूपच कमी प्रमाणात यंत्रांचा वापर केला जात होता.

यामुळे बैलजोडीच्या साह्याने शेतीची मशागत ते काढणीपर्यंतचा प्रवास शेतकरी बांधवांना करावा लागत असे. मात्र आता शेतीमध्ये मोठा बदल झाला असून बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने (Tractor) घेतली आहे. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि यंत्रांचा वापर वाढल्याने शेतकरी बांधवांना शेती करताना आता सोयीचे झाले आहे.

शिवाय यंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पादनात (Farmer Income) मोठी वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी या यंत्रांमुळे आणि तंत्रामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे.

मित्रांनो एकेकाळी बैल हा शेतकऱ्यांचा सोबती म्हणून ओळखला जात असे. मात्र आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असल्याने ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा सोबती म्हणून ओळखला जातो. मात्र असे असले तरी ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेतीची कामे करताना शेतकरी बांधवांना खूप अधिक डिझेलचा (Diesel) खर्च करावा लागतो.

अगदी शेती मशागतीपासून ते शेतमालाला बाजारपेठेत देण्यापर्यंत सर्व कामे ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने होत असल्याने शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय डिझेलचे दर आकाशाला गवसणी घालत असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आलेले ट्रक्टर आता शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ करण्यासाठी एक प्रमुख कारण बनले आहे.

मात्र जर शेतकरी बांधवांनी काही उपाययोजना केल्या तर निश्चितच ट्रॅक्टरच्या मायलेज (Tractor Mileage) मध्ये वाढ केली जाऊ शकते. आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी ट्रॅक्टरच्या मायलेज (Tractor Mileage) मध्ये कशा पद्धतीने वाढ केली जाऊ शकते या विषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून ठेवूया याविषयी सविस्तर.

1 किमीसाठी ट्रॅक्टरला किती डिझेल लागत बर 

  • शेतीशिवाय इतर अनेक कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो आणि या कामांसाठी डिझेलही वेगवेगळ्या प्रमाणात वापरले जाते.
  • ट्रॅक्टरने रोटाव्हेटर चालवल्यास दर तासाला 8 लिटर पर्यंत डिझेल लागते. त्याच वेळी, ट्रेलरवरील वजन वाहून 1 लिटर डिझेलच्या वापरामध्ये ट्रॅक्टर किमान 5-7 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतच मायलेज देतो.
  • अल्टरनेटर किंवा स्ट्रॉ रीपरबद्दल सांगायचे तर, ट्रॅक्टरचा वापर करताना, वेळ, काम आणि परिस्थितीनुसार ते दर तासाला 6-7 लिटर डिझेल खात असते.

अशा प्रकारे ट्रॅक्टरच मायलेज वाढवा आणि डिझेल वाचवा

  • शेतात नांगरणी करताना किंवा इतर शेतीची कामे करताना ट्रॅक्टर रुंदीऐवजी लांबीने चालवावा.
  • इंजिनमधील हवेचे परिसंचरण सतत चालू ठेवावे, यासाठी इंजिन साफ ​​करत राहावे.
  • इंजिनचे मोबिल ऑइल देखील वेळोवेळी बदलले पाहिजे, अशा प्रकारे डिझेलसह ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंगचा खर्च देखील वाचू शकतो.