Soybean Farming : खरीप हंगामात (Kharif Season) या वर्षी राज्यात सोयाबीन पेरणीच्या (Soybean Sowing) कालावधीमध्ये मोठी असमानता आहे. काही ठिकाणी आता सोयाबीन पीक (Soybean Crop) महिन्याचे झाले आहे तर काही ठिकाणी सोयाबीनचे पीक फुलोरा अवस्थेत आले आहे.

एवढेच नाही तर काही ठिकाणी सोयाबीनच्या पिकात शेंगा भरायला देखील सुरुवात झाली आहे. मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांचे (Farmer) एक ते दीड महिन्याचे पीक असेल शेतकरी बांधवांनी या कालावधीत अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असते. जाणकार लोकांच्या मते या कालावधीत कीटक रोग होण्याची शक्यता असते.

जाणून घ्या सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रण कसे करावे?

सोयाबीनच्या चांगल्या उत्पादनासाठी किट रोग नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे, तण नियंत्रणाबरोबरच सोयाबीन पेरल्यानंतर कीड नियंत्रण (Soybean Pest) देखील आवश्यक आहे. सोयाबीन पिकासाठी कोणते कीटकनाशक योग्य आहे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी स्टेम बोरर कीटकाचे कशा पद्धतीने नियंत्रण (Soybean Crop Management) केले जाऊ शकते आणि यासाठी कोणते किटकनाशक वापरावे याविषयी सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत.

स्टेम बोरर कीटक

स्टेम बोअरर किडीचे वैज्ञानिक नाव डॅक्टिस टेक्सन्स आहे.  या किडीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींना या किडीचा जास्त प्रादुर्भाव होतो. या किडीची अळी देठाच्या मध्यभागी एक बोगदा बनवून देठ खाते. हे किट सोयाबीन पिकाच्या पिकण्याच्या किंवा फुलोरा अवस्थेत तसेच फळधारणा होण्याच्या अवस्थेत तळापासून झाडे खाते. यामुळे सोयाबीन पिकाची मोठी शक्ती होते आणि उत्पादनात घट होते.

किट प्रतिबंधासाठी हे करा:-

 • खराब झालेले रोप उपटून नष्ट करा.
 • उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
 • प्रतिरोधक वाण जसे HRMSO 1564 वापरा.
 • पेरणी पावसाळ्यानंतर करावी.
 • योग्य बियाणे दरच घ्या.
 • जास्त नायट्रोजन खतांचा वापर करू नका.
 • जमिनीत पालाशची कमतरता असल्यास पालाश खताचा वापर निश्चित असावा.
 • तण नियंत्रित करा.
 • जैविक नियंत्रणासाठी कोळी, सरडे, पक्षी इत्यादींचे संरक्षण करावे.
 • सोयाबीन पिकात आंतरपीक घ्यावी. लवकर पक्व होणारी तूर किंवा मका किंवा ज्वारी 4:2 या प्रमाणात घेऊन सोयाबीन पिकाचा अंतर लागवड करता येऊ शकते.

स्टेम बोअरर कीटक नियंत्रण

 • अशा प्रकारे स्टेम बोअरर किडीचे रासायनिक कीटकनाशकांनी नियंत्रण करा.
 • खालीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक 600-800 लिटर पाण्यात वापरा.
 • जेव्हा कीटकांची संख्या आर्थिक उंबरठा ओलांडते तेव्हा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.
 • मोनोक्रोटोफॉस 36 एसएल 800 मिली/हेक्टर दराने फवारणी करा.
 • क्विनॉलफॉस 25 एमसी 1000 मिली/हेक्टर दराने फवारणी करा.

मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर तज्ञ लोकांचा सल्ला घेणे अपरिहार्य बाब राहणार आहे.