Agriculture News : मित्रांनो पिकांच्या वाढीसाठी खतांचा उपयोग केला जातो. सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) उपयोग करून पिकांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांचा पुरवठा केला जातो. डीएपी (DAP) हे देखील एक प्रमुख खत असून याचा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. मात्र अनेकदा या खताचा शॉर्टेज निर्माण होतो.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना (Farmer) यासाठी पर्यायी खते (Fertilizer) वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी डीएपी खताचा नेमका फायदेशीर पर्याय कोणता या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो आज आपण डीएपी खताला पर्यायी खते याची माहिती जाणून घेणार आहोत.

विशेष म्हणजे डीएपी खताला पर्यायी खते आज आपण सांगणार आहोत ती पर्यायी खाते डीएपी पेक्षा स्वस्त राहणार आहेत. शिवाय यामुळे डीएपी पेक्षा अधिक रिजल्ट बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात (Farmer Income) वाढ होण्यास मदत होणार आहे.

मित्रांनो खरं पाहता पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा करण्यासाठी शेतकरी बांधव खतांचा वापर करत असतात. मात्र खतांचा वापर हा माती परीक्षणाच्या आधारे केला गेला पाहिजे.

मातीत ज्या पोषक घटकांची कमतरता असते अशा पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी खतांचा उपयोग केला गेला पाहिजे. यामुळे खतांचा होणारा अनिर्बंध वापर टाळता येण्यासाठी मदत होणार आहे शिवाय शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया डीएपी खताला नेमकी कोणती पर्यायी खते आहेत. 

मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधव असल्यास ऐवजी युरिया अधिक एस एस पी या संयुक्त खताचा वापर करू शकतात. अनेकदा बाजारात डीएपी खताचा तुटवडा असतो, आणि हे खत अनेक शेतकऱ्यांना उपलब्ध होतं नसते, अशा परिस्थितीत शेतकरी डीएपी खताच्या जागी एसएसपी प्लस युरियाचाही म्हणजे सिंगल सुपर फास्फेट आणि युरिया यांचे मिश्रण वापर करू शकतात. आणि आपली गरज पूर्ण करू शकतात, याचा एक फायदा असाही आहे की, हे शेतकऱ्यासाठी खूप किफायतशीर आहे.

सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मध्ये कोणते घटक आहेत?

शेतातील मातीमध्ये अनेक प्रकारचे आवश्यक पोषक घटक आढळतात, जे वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असतात आणि या घटकांची कमतरता पूर्ण करण्यासाठी शेतकरी बाहेरून रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर करतात. अशा परिस्थितीत, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) हे पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. सिंगल सुपर फॉस्फेट हे स्फुरदयुक्त खत आहे, ज्यामध्ये 16 टक्के स्फुरद आणि 11 टक्के सल्फर असते. तसेच यामध्ये कॅल्शिअम 19 टक्के आणि जिंक एक टक्के असते. यामध्ये उपलब्ध गंधकामुळे हे खत तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी इतर खतांपेक्षा अधिक फायदेशीर आहे.

DAP ऐवजी SSP + Urea चे अधिक फायदे मिळतील

सिंगल सुपर फॉस्फेट एसएसपी खत डीएपीपेक्षा स्वस्त आहे.

हे खत बाजारात सहज उपलब्ध होतं.

डीएपीमध्ये 23 किलो फॉस्फरस आणि 9 किलो नायट्रोजन प्रति बॅग असते.

डीएपी ऐवजी एसएसपी + युरिया पिकाला दिल्यास नफा दुपटीने वाढेल

पिकांमध्ये फॉस्फरस, नायट्रोजन आणि सल्फर पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी डीएपी + सल्फरला पर्याय म्हणून एसएसपी + युरिया वापरल्यास, डीएपी + सल्फरपेक्षा कमी किमतीत अधिक नायट्रोजन, स्फुरद आणि सल्फर मिळू शकते. यासाठी 1 बॅग डीएपी + 16 किलो सल्फरला पर्याय म्हणून 3 बॅग एसएसपी + 1 बॅग युरियाचा वापर केला जातो, त्यामुळे अधिक नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर अगदी कमी किमतीत मिळू शकतात.