Agriculture News : मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र आपल्या देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) कायमचं नुकसान सहन करावे लागते. अनेकदा अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी (Heavy Rain) सारख्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होतं असते.

अशा परिस्थितीत आता शेतकरी बांधवांचे नुकसान कमी करण्यासाठी भारतीय हवामान विभाग पुढे सरसावले आहे. मित्रांनो भारतीय हवामान विभागाने हवामानाचा अचूक अंदाज शेतकरी बांधवांना लगेचचं उपलब्ध व्हावा या हेतूने मेघदूत मोबाईल अँप्लिकेशनची (Meghdut Mobile Application) निर्मिती केली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मेघदूत हे अँप्लिकेशन भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्या संयुक्त पुढाकाराने विकसित करण्यात आले आहे.

या एप्लीकेशनच्या मदतीने देशातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज (Weather Update) आणि अंदाजावर आधारित सल्ला (Agriculture Advice) दिला जाणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांचा मोठा फायदा होणार असून पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान निश्चितच यामुळे कमी करता येणार आहे.

मेघदूत मोबाईल अँप्लिकेशन (Mobile Application) मान्सून 2019 पासून सक्रिय आहे आणि आता हे ऍप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त सोयीसह आले आहे. अँप्लिकेशनची (Farming Application) अद्ययावत आवृत्ती ब्लॉक लेव्हल वैशिष्ट्ये सक्षम करते, जिथे शेतकरी जोखीम व्यवस्थापनासाठी ब्लॉक लेव्हल माहिती ऍक्सेस करू शकतात. 6970 ब्लॉक्ससाठी ब्लॉक लेव्हल हवामान अंदाज आणि 3100 ब्लॉक्ससाठी ब्लॉक लेव्हल अॅग्रोमेट अॅडव्हायझरी आता या अॅप अंतर्गत जोडण्यात आली आहे जिथे वापरकर्ते अपडेट्स मिळवण्यासाठी त्यांच्या स्थानासाठी नोंदणी करू शकतात.

IMD च्या ग्रामीण कृषी हवामान सेवेअंतर्गत देशभरात स्थापन केलेल्या 330 युनिट्सच्या नेटवर्कद्वारे या सूचना दर मंगळवार आणि शुक्रवारी अद्यतनित केल्या जातात. या ॲप्लिकेशन मध्ये जेवढ्या स्थानिक भाषा आहेत तेवढ्या ठिकाणी स्थानिक भाषेत सूचनाही जारी केल्या जातात. सध्या इंग्रजी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये सल्ला या ॲप्लिकेशनच्या मदतीने जारी केला जात आहे.

मेघदूत मोबाईल अॅपद्वारे (Agriculture Application) खालील या सेवा पुरविल्या जातात

जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील हवामान अंदाज: तापमान, पाऊस, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा यासंबंधीचा अंदाज पुढील पाच दिवसांसाठी दररोज अपडेट केला जातो.

जिल्हा आणि ब्लॉक लेव्हल अॅग्रोमेट अॅडव्हायझरी: हवामान आधारित अॅडव्हायझरी दर मंगळवार आणि शुक्रवारी अपडेट केली जाते.

नॉकास्ट: 732 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या सुमारे 1019 स्थानकांसाठी IMD च्या राज्य हवामान केंद्रांद्वारे स्थानिक हवामान घटना आणि त्यांची तीव्रता यांचे तीन तासांचे इशारे देखील जारी केले जातात. हे खराब हवामानात देखील कार्य करते.

मागील हवामान: जिल्हा स्तरावर जेथे उपलब्ध असेल तेथे 10 दिवसांची हवामान माहिती या ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकरी बांधवांना मिळणार आहे.

मेघदूत मोबाईल अॅप कसे डाउनलोड करावे जाणून घ्या बर…!

अशा परिस्थितीत मेघदूत मोबाईल अँप्लिकेशन डाऊनलोड करून शेतकऱ्यांना आता त्यांच्या क्षेत्रानुसार हवामानविषयक माहिती सहज मिळू शकणार आहे. त्यामुळे सतत बदलणाऱ्या हवामानापासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे.

अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://play.google.com/store/apps/details?id=com.aas.meghdoot&hl=en_IN&g