Agriculture News : येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव (Farmer) हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात. शेतकरी बांधवांना खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी बियाण्यांची (Seed) खरेदी करणे हेतू पैशांची मोठी कमतरता जाणवणार आहे. शेतकरी बांधवांची हीच परिस्थिती जाणून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज यांच्याकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी गहू आणि हरभरा बियाण्यावर अनुदान (Subsidy) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांचे दोन लाख 66 हजार क्विंटल बियाणे महाबीज कडून बाजारात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान (Seed Subsidy) शासनाकडून मिळणार असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा व ग्राम बीजोत्पादन योजना या राष्ट्रीय योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे खरेदीवर अनुदान पुरवले जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या बियाण्याला किती अनुदान मिळणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

गहू आणि हरभरा बियाण्यावर मिळणार ‘इतके’ अनुदान

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, शेतकरी बांधवांना दहा वर्षांच्या आतील बियाणं खरेदी करण्यासाठी 25 रुपये अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच हरभऱ्याची पीकेव्ही कांचन, फुले विक्रम, फुले विक्रांत, राजविजय 202 यांसारख्या दहा वर्षांच्या आतील बियाणं यासाठी शेतकऱ्यांना 25 रुपये किलो अनुदान मिळणार आहे. बाजारात या बियाण्यांचा तर सत्तर रुपये प्रति किलो असा आहे मात्र अनुदान अंतर हे बियाणे 45 रुपये प्रति किलो या दराने शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

तसेच शेतकरी बांधवांना दहा वर्षांपेक्षा अधिक काळाचे बियाण्यासाठी प्रति किलो 20 रुपये अनुदान मिळणार आहे. जॅकी-9218, दिग्विजय, विजय, विशाल, विराट या हरभरा बियाण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति किलो 20 रुपये अनुदान मिळणार आहे. बाजारात या बियाण्याची किंमत 70 रुपये प्रति किलो असून अनुदाना नंतर या बियाण्यासाठी शेतकऱ्यांना 50 रुपये प्रतिकिलो एवढा खर्च येणार आहे.

याशिवाय शेतकरी बांधवांना गव्हाच्या बियाण्यावर देखील अनुदान मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 36 हजार क्विंटल गव्हाचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार आहे. दहा वर्षांच्या आतील गव्हाच्या बियाण्यावर शेतकऱ्यांना 15 रुपये प्रति किलो अनुदान मिळणार आहे. मित्रांनो पीकेव्ही सरदार, समाधान, एमएसीएस-6478, युएएस-428, डीबीडब्ल्यू- 168 हे गव्हाचे दहा वर्षांच्या आतील बियाणे बाजारात 40 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध आहे. मात्र याला 15 रुपये प्रति किलो अनुदान मिळणार असल्याने हे बियाणे शेतकऱ्यांना 25 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे.

तसेच शेतकरी बांधवांना दहा वर्षांपेक्षा अधिक काळाच्या बियाण्यावर देखील पंधरा रुपये प्रतिकिलो अनुदान मिळणार आहे. मित्रांनो गव्हाचे फुले नेत्रावती, लोकवन, एमएसीएस-6222, एचआय- 1544, जीडब्ल्यू -496, एचआय-8663 हे बियाणं बाजारात 42 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध आहे. मात्र अनुदानानंतर हे बियाणे शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे.

शेतकरी बांधवांना बियाण्यावर अनुदान मिळवणे हेतू महाडीबीटी या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. निश्चितच शेतकरी बांधवांचे खरीप हंगामात नुकसान झाले असल्याने अनुदानावर बी-बियाणं घेऊन शेतकऱ्यांना रब्बी हंगामात खरिपात झालेल्या नुकसानीची भरपाई करता येणे शक्य होणार आहे.