Agriculture News : महाराष्ट्रात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना प्रणित तत्कालीन महा विकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Sarkar) महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम कर्जमाफीची मोठी घोषणा केली होती.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना (Mahatma Jyotirao Phule Farmers Loan Waiver Scheme) अन्वये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) कर्जमाफी करण्यात आली होती. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान (Farmer Subsidy) देण्याची घोषणा केली होती.

मात्र तदनंतर संपूर्ण जगात कोरोना नामक महाभयंकर आजाराने थैमान माजवलं यामुळे संपूर्ण जगाची परिस्थिती खूपच बिकट बनली होती. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत देखील खळखळाट निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाला (Maharashtra Government) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देता येणे अशक्य बनले होते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सत्ताबदल होण्याच्या काही दिवस आधीच पूर्वीच्या महा विकास आघाडी सरकारने राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये अनुदानाची रक्कम लवकरात लवकर दिली जाईल असे सांगितले होते. याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेत ग्वाही दिली होती.

मात्र राज्यात शिवसेना या सत्ता पक्षात मोठे बंड उभे झाले आणि एकनाथ शिंदे समवेतच 40 शिवसेना आमदार सत्तेतून बाहेर पडले. परिणामी महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता राज्यात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट यांचे मिळून शिंदे सरकार स्थापन झाले आहे. शिंदे सरकार (shinde government) सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच्या सरकारने केलेले अनेक निर्णय फिरवून लावलेत.

अशा परिस्थितीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय शिंदे सरकार हाणून पाडते की काय याबाबत शेतकर्‍यांमध्ये मोठी संभ्रमता होती. मात्र शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय जशास तसा ठेवून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची आता थेट तारीखच डिक्लेअर केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान सप्टेंबर महिन्यापासून दिले जाणार आहे. तसेच राज्यातील पूरग्रस्त लोकांना देखील 15 हजारांची तात्काळ मदत दिली जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या अनुदानाचा मुद्दा लवकरच मार्गी लागणार असल्याचा सांगितले जात आहे.