Agriculture News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र असे असले तरी आतापर्यंत, शेती (Farming) हे एक अनिश्चित आणि जोखमीचे क्षेत्र म्हणून आपल्या देशात ओळखले जात होते. अनेकदा हवामानाच्या बदलामुळे (Climate Change) पिकांवर नानाविध प्रकारचे संकट येत असतात.

कधी कधी अवकाळी पाऊस, दुष्काळ यासारख्या पावसाच्या अनिश्चित स्वभावामुळे पिकांवर मोठा विपरित परिणाम होतो आणि उत्पादनात भली मोठी घट होते. अनेकदा वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे पिकांवर कीटक-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, परिणामी शेतकरी बांधवांना (Farmer) याच्या नियंत्रणासाठी चांगलीच मशक्कत घ्यावी लागते.

यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात देखील मोठी वाढ होते. या सर्व समस्यांचा पिकांच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असे, परंतु आता शेतीचे नवीन तंत्र आले आहेत. या नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने या समस्या दूर होऊ शकतात. किंवा या समस्यांचे वेळीच निराकरण करता येऊ शकते.

आता तुम्ही म्हणाल हे तंत्र नेमक आहे तरी काय तर मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे तंत्र आहे शेतीसंबंधित असलेले मोबाईल अँप्लिकेशन (Farming Application). जे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतीशी संबंधित समस्यांबद्दल सजग करतात, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये येथे नमूद केलेले मोबाइल अॅप्लिकेशन (Agriculture Mobile Application) असणे आवश्यक आहे.

पुसा कृषी अँप्लिकेशन- हे अँप्लिकेशन ICAR_IARI म्हणजेच पुसा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी लॉन्च केले आहे, ज्याच्या मदतीने शेतकरी थेट तज्ञांशी संपर्क साधू शकतात आणि समस्या सोडवू शकतात. हे अँप्लिकेशन शेतकऱ्यांना नवीन शेती तंत्र, सुधारित वाण तसेच हवामानाशी संबंधित माहिती आणि हवामानावर आधारित शेतीबद्दल जागरूक करते. पिकांची शास्त्रोक्त शेती आणि समस्यांवर शास्त्रीय उपाय देखील या ऍप्लिकेशनवर आहेत.

आत्मनिर्भर कृषी ऍप – आत्मनिर्भर अभियानाला शेतीशी जोडून आत्मनिर्भर कृषी ऍप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे, ज्यावर A टू Z माहिती आणि शेतीशी संबंधित समस्यांवर एकत्रित उपाय उपलब्ध आहेत. हे मोबाईल अँप्लिकेशन हवामानाचा अंदाज, हवामानावर आधारित शेती, पिकांची माहिती, जमिनीचे आरोग्य, भूजल पातळी आणि पाण्याची उपलब्धता तसेच पिकांच्या समस्या, त्यांची वाढ आणि कीड रोगाच्या संसर्गाची माहिती देते.

पीएम किसान अँप्लिकेशन- हे मोबाईल अँप्लिकेशन शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी जोडते. या अँप्लिकेशनच्या मदतीने शेतकरी त्यांच्या आगामी हप्त्याचा म्हणजेच आर्थिक मदतीची रक्कम घरी बसून घेऊ शकतात. या मोबाईल अँप्लिकेशन मध्ये सामील होऊन, नवीन शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतात आणि जुने लाभार्थी शेतकरी आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि केवायसी द्वारे पीएम किसान हप्त्यांची स्थिती तपासू शकतात.

कृषी ज्ञान अँप्लिकेशन- शेतीव्यतिरिक्त पशुसंवर्धन, मशरूम उत्पादन, मधमाशी पालन आणि कुक्कुटपालन यासंबंधीची माहितीही गावकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. या अँप्लिकेशन मध्ये पीक उत्पादनाचे प्रगत तंत्रज्ञान, बियाणे, खतांचे प्रशिक्षण आणि नवीन शेती तंत्र आणि पिकाचे विपणन यासंबंधी माहिती उपलब्ध आहे. याच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांचे काढणीपश्चात व्यवस्थापन, कीड, रोग आणि तण नियंत्रणाच्या कामाचीही माहिती मिळू शकते.

E-NAM अँप्लिकेशन- शेतकऱ्यांना MSP वर पिकांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करता यावी यासाठी, E-NAM चे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल आणि अँप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय कृषी बाजार आणि शेतकरी या अॅपशी थेट जोडलेले आहेत. या अँप्लिकेशनच्या मदतीने शेतकरी त्यांच्या जवळच्या मंडई किंवा इतर राज्यातील मंडईत घरी बसून प्रवेश करू शकतात. पिकांची विक्री किंमत ठरवू शकतो आणि बोली लावून पिकांची विक्री देखील करू शकतो.